For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थी लिहणार पालकांना पत्र; माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची माहिती

12:50 PM Apr 18, 2024 IST | Abhijeet Khandekar
मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थी लिहणार पालकांना पत्र  माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची माहिती
Kolhapur ZP
Advertisement

गुरुवारी सुमारे 4 लाख विद्यार्थी लिहणार पालकांना पत्र; प्रभात फेरीचेही आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिह्यात मतदार जनजागृती करण्यासाठी ‘पालकांस मुलाचे पत्र’ व ‘प्रभात फेरी’चे आयोजन केले असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. त्यानुसार गुरवारी (18 रोजी) जिह्यातील सुमारे 4 लाख विद्यार्थी आपल्या पालकांना पत्र लिहून या उपक्रमाचा विश्वविक्रम करण्याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाचे नियोजन आहे.

Advertisement

पत्रकात म्हटले आहे, मतदान जनजागृतीसठी शाळास्तरावर कृती कार्यक्रम आयोजित करण्यासाठी 3 एप्रिल रोजी सर्व शाळांना पत्राद्वारे कळविले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांना 16 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या व्हि.सी. मध्ये आवाहन केले आहे. त्यानुसार 18 एप्रिल रोजी शिक्षकांनी पोस्ट कार्ड अथवा आंतरदेशिय पत्र घेऊन विदयार्थ्याना मतदान जनजागृती संदर्भात पत्र लेखनाबाबत मार्गदर्शन करावे. यामध्ये 100 टक्के विदयार्थ्याचा सहभाग घेऊन वर्गातील सर्व विद्यार्थी व पत्रासोबत शिक्षकांनी एकत्रित फोटो घ्यावा. पत्रलेखन उपक्रमाबाबत 2-3 मिनिटांचा शाळेचा व्हिडीओ तयार करावा. 3 ते 4 लाख मुलांना सहभागी करून घेऊन पालकांस पत्र लिहिण्याचा विश्वविक्रम करण्याचे नियोजन असल्याचे आंबोकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

19 एप्रिल रोजी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी साडेसात ते साडेआठ या वेळेत गाव अथवा शहरामध्ये प्रभात फेरी काढायची आहे. 100 टक्के शाळांनी उत्स्फुर्त सहभाग घ्यावा. रॅलीदरम्यान मतदान जनजागृतीचे बॅनर, फलक तयार करून घोषवाक्य निश्चित करावे. रॅलीचे फोटो, व्हिडीओ तयार करावे. या प्रभातफेरीमध्ये ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, कृषी सहाय्यक, आरोग्य अधिकारी व कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी सेविकांनी सहभाग घ्यावा. सदर कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ प्ttज्s://िदस्s.gत/एक्न्रंण्ल्झि्न्ल्क्dxRण्A या लिंकवरती अपलोड करावे. जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय अधिकारी 18 एप्रिल रोजी शाळांना भेटी देवून उपक्रमाची अमंलबजावणी बाबत पाहणी करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.