Kolhapur : 'सीपीआर'मध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णाच्या मदतीला धावले विद्यार्थी !
ब्लूमिंग बर्डस् इंग्लिश मीडियम स्कूलचा उपक्रम
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयात (सीपीआर) उपचार घेणाऱ्या एका अनोळखी वृद्धाच्या शस्त्रक्रियेसाठी निगवे दुमाला (ता. करवीर) येथील ब्लूमिंग बर्ड्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत केली. सचिन सुळे असे या रूग्णाचे नाव असुन त्यांचे कोणीही नातेवाईक नाहीत. तसेच त्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड नसल्यामुळे योजनेतून उपचार होत नव्हते. विद्यार्थ्यांना समजताच रुग्णाच्या ऑपरेशन करता लागणाऱ्या खर्चाची रक्कम दिली. यातून गुरूवार दि.१६ रोजी त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आठवडी बाजार भरविला होता. या उपक्रमा अंतर्गत जमा झालेले पैसे मुलांनी एकत्र करून समाजपयोगी कार्य करण्याचे ठरवले. सीपीआरमधील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागांमध्ये कळाल्यानंतर त्यांनी सीपआरच्या उपचाराकरिता दाखल असलेल्या रुग्णाला पायात रॉड घालून ऑ परेशनसाठी मदतीची गरज असल्याचे कळल्यानंतर मदत समितीचे सदस्य सचिव महेंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून जमा झालेली रक्कम उपचारासाठी दिली.
यावेळी अधिष्ठता डॉ. अजित लोकरे यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, विभागाचे प्रमुख डॉ. राहुल बडे, डॉ. घनश्याम पोळ, शशिकांत राऊळ, ब्लूमिंग बर्ड्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या वैशाली चव्हाण, हर्षदा चव्हाण, रोहिणी गांगुर्डे आदींसह अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.