महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली 'इस्रो' सफर

01:48 PM Dec 02, 2024 IST | Pooja Marathe
Students of Phatak High School made a trip to ISRO
Advertisement

रत्नागिरी

Advertisement

शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अवकाशाबद्दल कुतूहल निर्माण व्हावे, तसेच अवकाश संशोधनाची गोडी लागावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना इस्रोची सफर घडवण्यात आली. प्रशालेतील शिक्षकांनीही या अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला होता.

Advertisement

बेंगळूरु येथील इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) या अवकाश संशोधन संस्थेच्या स्थापनेपासूनचा इतिहास, आजपर्यंत केलेल्या अवकाश संशोधन मोहिमा, संस्थांमध्ये संशोधन कसे केले जाते? शास्त्रज्ञ कसे काम करतात? अवकाश संशोधनात करिअर कसे करावे? त्यासाठी शिक्षण आणि विविध परीक्षा आदीबाबतची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. रविवारी सुरू झालेल्या या अभ्यास दौऱ्यात पद्मनाम मंदिर दर्शन, नेव्पर वन्यजीव अभयारण्य व धरण, त्रिवेंद्रम पैलेस, त्रिवेंद्रम प्राणीसंग्रहालय, आर्ट गॅलरी यांना भेट देण्यात आली. या दौऱ्यात रॅकिट लांचिग व सायन्स म्युझियम भेट, सुचिंद्रम मंदिर भेट तर स्वामी विवेकानद मेमोरियल दर्शन, कन्याकुमारी देवी दर्शन घेण्यात आले या उपक्रमासाठी दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चाबासाहेब परुळेकर यांची प्रेरणा मिळाली संस्थेच्या
सचिव अँड सुमिता भावे, सीईओ दाक्षायणी बोपर्डीकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लामले.

या अभ्यास दौऱ्याचे आयोजन फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक राजन कीर यांनी केले होते या अभ्यास दौऱ्यात दिलीप मातडे, लक्ष्मण सावर्डेकर, मंदार सावंत, इंद्रसिंग वळवी, संदीप आखाडे, दत्तात्रय बनगर, पूर्वी जाधव, निवेदिता कोपरकर या शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article