मळगाव इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश
बुद्धीबळ, धनुर्विद्या, कराटे, बॉक्सिंग, मॅरेथॉन, कॅरम आदी स्पर्धांमध्ये जिल्हा व विभागीय पातळीपर्यंत मजल
न्हावेली / वार्ताहर
तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा प्रकारातील बुद्धीबळ, धनुर्विद्या, कराटे, बॉक्सिंग, मॅरेथॉन व कॅरम आदी स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करत जिल्हा व विभागीय पातळीपर्यंत मजल मारली आहे.बुद्धीबळ स्पर्धा बांदा येथे धनुर्विद्या, कराटे व बॉक्सिंग ओरोस येथे तर मॅरेथॉन व कॅरम स्पर्धा सावंतवाडी येथे पार पडल्या. यात प्रशालेच्या गणेश सुभाष नाईक, वैभवी गोविंद परब, त्रिशा कृष्णा गावकर यांची बुद्धीबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झाली आहे. नारायण विद्याधर मांजरेकर, श्रुती भिसाजी जाधव, अदिती आनंद राणे यांची धनुर्विद्या स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड झाली आहे. रुणाल सुहास पेडणेकर व अलिशा विष्णू गावडे यांची कॅरममध्ये जिल्हास्तरावर निवड झाली आहे. प्रज्ञा विनायक राणे हिने कराटेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम तर बॉक्सिंगमध्ये जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. दिक्षा न्हानू जोशी हिने बॉक्सिंगमध्ये जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. भाग्यश्री महेश बाईत हिने कराटेमध्ये जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. १४ वर्षाखालील वयोगटात गंधार हरीश नार्वेकर याने कॅरममध्ये प्रथम तर खुल्या गटात समीक्षा जानू खरात याने मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. ओम मदन शिरोडकर १४ वर्षाखालील वयोगटात मॅरेथॉनमध्ये ५ वा क्रमांक पटकाविला. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संदीप कारिवडेकर, आनंदी मोर्ये, किरण देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मळगाव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष शिवराम मळगावकर, सचिव आर. आर. राऊळ, संस्था सदस्य रामचंद्र केळुसकर, शाळा समितीचे चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक मारूती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, पालक-शिक्षक संघांचे सदस्य सिद्धेश तेंडोलकर, सर्व संस्था पदाधिकारी व शाळा समिती पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, माता-पालक संघ, शिक्षक-पालक संघ, माजी विद्यार्थी परिवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.