स्वप्निल कुसाळेच्या पदकासाठी धामोडच्या विद्यार्थ्यांनी केली अनोखी विश्वप्रार्थना
धामोड / वार्ताहर
नेमबाज स्वप्निल कुसाळेने ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकावे यासाठी धामोड ( ता राधानगरी ) येथील लोकनेते आण्णासाहेब नवणे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली अनोखी विश्वप्रार्थना . हातात पुष्पगुच्छ घेऊन विद्यार्थ्यांनी त्याला पदक जिंकण्यासाठी हृदयपूर्वक शुभेच्छाही दिल्या .
कांबळवाडी (ता. राधानगरी ) या गावचा सुपुत्र कु . स्वप्नील सुरेश कुसाळे हा पॅरिस येथे सुरू असणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी सहभागी झाला आहे . ५० मीटर एअर रायफल पोझिशन्स अंतिम फेरीत तो सातव्या क्रमांकावर आला आहे .आज दुपारी एक वाजता त्याची अंतिम फेरीत लढत होत आहे .या स्पर्धेत त्याने पदक जिंकावे यासाठी धामोड (ता. राधानगरी )येथील लोकनेते आण्णासाहेब नवणे विद्यालयाच्यावतीने सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी हातात पुष्पगुच्छ घेऊन त्याच्यासाठी विश्वप्रार्थना केली व त्याला या स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या .
यावेळी मुख्याध्यापक ए एस पाटील अध्यापक एस बी चरापले , ए बी जोंग , एन जी नलवडे ,जे के गुंडप , एस ए मोरे, पुनम जाधव ,एन एल जाधव , सीतराम फडके , संजय पाटील , अजित खाडे ,सुभाष कांबळे आदीसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
स्वप्नील कुसाळे हा छोट्याश्या खेडेगावातील असून आमच्या शिवेशेजारील असल्याने आंम्हाला त्याचा अभिमान आहेच परंतू स्वप्नीलचा भारत देश वाशियांनाही अभिमान असल्याचे मत लोकनेते आण्णासाहेब नवणे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए एस पाटील यांनी व्यक्त केले