कोकणातली विद्यार्थी लय भारी, भाषा शिकतात न्यारी न्यारी...
कोकणातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जर्मन भाषेचे धडे...
सिंधुदूर्ग
जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींची कमालच अतिदुर्गम शाळेत सुद्धा विद्यार्थ्यांना जर्मन भाषेतील धडे दिले जात आहेत. सावंतवाडी इथल्या चौकूळ च्या वाडीतील शाळेत शिक्षक जावेद तांबोळी यांनी आनंददायी शनिवारी विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. 4 ही मराठी वाडीतील शाळा आहे. शाळा तशी दुर्गमच. शाळेत विद्यार्थीही बोटावर मोजण्या इतपत. वाडीत जेमतेम वीस ते तीस घरे शाळेत कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नाही मात्र विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हीच शिक्षणाची व्याख्या आहे या अनुषंगाने या शाळेत हजर झालेले शिक्षक तांबोळी हे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी लागावी त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता विविध कौशल्य आत्मसात करावीत या हेतूने आनंददायी शनिवारी वेगवेगळे उपक्रम घेत असतात. या शनिवारी त्यांनी मुलांना चक्क जर्मन भाषेचे धडे दिले. जर्मन भाषेची बेसिक ओळख एक ते 10 अंक आणि अल्फाबेट्स जर्मनीतून शिकवले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी हे लगेच आत्मसात देखील केलं.मातृभाषेबरोबर इंग्रजी जशी महत्वाची तशी जर्मण भाषेचं सुद्धा महत्व असल्याच तांबोळी यांनी सांगितलं.