अभ्यासिका, वसतीगृह उभारणी लवकरच
मिरज :
मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य सरकार कायदेशीर प्रक्रिया पूर्ततेसाठी प्रयत्नशील आहे. याशिवाय सांगलीतील मराठा समाजासाठी अभ्यासिका, ग्रंथालय व वस्तीगृह उभाऊन देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मराठा महासंघाचे राज्य समन्वयक विलास देसाई यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांना समाजाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार बैठक पार पडली. अशोक पाटील, राहूल पाटील, दादासाहेब पाटील, तानाजी भोसले, प्रदीप पाटील यांनी समाजाचे विविध विषय मांडले.
जिह्यात मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी अभ्यासिका, ग्रंथालय व वस्तीगृह सुरू करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी fिदले. जिह्यातील जिल्हा परिषदेचे बिंदू नामावली रोस्टरमध्ये काही घोळ आहे का, या संदर्भात चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला स्वतंत्र कार्यालय देणे, एसीबीसीचे दाखले, जात पडताळणीसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीकोनातून टास्क फोर्स तयार करणे. राज्यात पंजाबराव देशमुख वस्तीगृह भत्ता मिळणे. शिक्षण विषयात मराठा समाजाला येणाऱ्या अडचणींसदर्भात राज्याच्या शिक्षण विभागाशी स्वतंत्र बैठक घेऊन विषय मार्गी लावले जातील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.