For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परीट समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे : दिलीप भालेकर

04:32 PM Jun 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
परीट समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे   दिलीप भालेकर
Advertisement

परीट समाज संघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

परीट समाजाच्या उन्नती व उत्कर्षासाठी समाज बांधवांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. परीट समाजाला एकसंघ करण्यासाठी श्री संत गाडगे महाराज परीट समाज संघ, सिंधुदुर्ग ने पुढाकार घेतला आहे. परीट समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे नाव रोशन करावे. परीक्षांमध्ये अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा यश संपादन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, तसेच यापुढील काळात संघामार्फत शैक्षणिक, सामाजिक यासह अन्य उपक्रम हाती घेतले जाणार असल्याचे, श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघाचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी सांगितले. श्री संत गाडगे महाराज परीट समाज सिंधुदुर्ग संघाच्यावतीने प.पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या भक्त निवास सभागृहात परीट समाजातील दहावी, बारावी, पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता.यावेळी श्री संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर महिला जिल्हाध्यक्ष सौ. दिपाली भालेकर, उपाध्यक्ष नागेश कुडाळकर, प्रसाद पाटकर, विलास साळसकर, धनश्री चव्हाण, सचिव अनिल शिवडावकर, सहसचिव गुरुनाथ मडवळ, खजिनदार संदीप बांदेकर, सहखजिनदार अशोक आरोलकर, सदस्य गणेश शिवडावकर, विनायक चव्हाण, किरण कुणकेश्वरकर, संदीप कडू, संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र भालेकर, सदानंद अणावकर, भालचंद्र करंजेकर, विजय पाटील, महेंद्र आरोलकर, शेखर कडू, श्रीकृष्ण परीट, महिला तालुकाध्यक्ष सौ.मनाली चव्हाण, सौ.अक्षता कुडाळकर, सौ. देवयानी मडवळ, श्रीम. वैशाली हडकर, शरद परीट इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अनिल शिवडावकर यांनी केले. यावेळी सौ. दिपाली भालेकर, विलास साळसकर, प्रदीप नारकर, राजेंद्र भालेकर, शरद परीट, दीपक चव्हाण यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिट समाजातील दहावी, बारावी, पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू, गाडगे महाराजांची प्रतिमा, प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत शहाकार यांनी केले, मान्यवरांचे स्वागत कणकवली तालुकाध्यक्ष भालचंद्र करंजेकर यांनी केले तर आभार प्रसाद पाटकर यांनी मानले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीट समाजातील मोठ्या संख्येने समाज बांधव व भगिनी व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.