महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विद्यार्थी रमले शेतीच्या बांधावर !

04:29 PM Jul 13, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

तेंडोली-भोमवाडी शाळेतील मुलांनी गिरविले बांधावरच्या शाळेत धडे

Advertisement

वार्ताहर । कुडाळ

Advertisement

राज्य शासनाच्या आनंददायी शनिवार या संकल्पनेनुसार जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा तेंडोली-भोमवाडी शाळेतील मुलांनी बांधावरची शाळा हा उपक्रम तेथीलच शेतकरी गोपाळ राऊळ यांच्या शेतात अनुभवला.यावेळी मुख्याध्यापिका योगिता पवार, उपशिक्षिका प्रज्ञा परुळेकर, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतील बहुतांश मुले ही शेतकरी कुटुंबातील असतात. मुलांमध्ये लहानपणापासून शेतीबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी शासनाकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकरी हा आपला मित्र आहे. तो दिवस-रात्र शेतात राबून धान्य पिकवितो. त्यामुळे आपल्या सर्वांना धान्य मिळते. आपले पोषण करतो. मुलांमध्ये आतापासून शेतीबद्दल प्रेम, आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या आनंददायी शनिवार या संकल्पनेनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत बांधावरची शेती हा उपक्रम राबविला. शेतकरी गोपाळ राऊळ यांच्याशी संवाद साधत माहिती जाणून घेतली. भात लावणी व शेतीबाबत सर्व अनुभव मुलांनी अनुभवला. शाळा व्यवस्थापन समिती व शेतकऱ्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी झाला.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # sindhudurg# news update # kudal
Next Article