For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मातृभाषेतून शक्षण घेतलेले विद्याथीर् जगाच्या पाठीवर

12:14 PM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
मातृभाषेतून शक्षण घेतलेले विद्याथीर् जगाच्या पाठीवर
Advertisement

माजी प्राचार्य आनंद मेणसे यांचे प्रतिपादन : मातृभाषेतून शिक्षणामुळेच अनेक राष्ट्रे प्रगतीपथावर

Advertisement

वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी खुर्द मराठी प्राथमिक शाळेचे अनेक विद्यार्थी मातृभाषेतूनच शिक्षण घेऊन देश व विदेशात सेवेसाठी कार्यरत आहेत. महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची गंगा सुरू केली. म्हणून आज स्त्रिया सुद्धा पुरूषांच्या खाद्यांला खांदा लावून समाजामध्ये पुढे येत आहेत. शाळा टिकवा, शाळा जगवा या संदेशाचे पालन करत आज प्रत्येकाने आपल्या पाल्यांना मातृभाषेतूनच शिक्षण देऊन शिक्षणाची गंगा अशीच तेवत ठेवली पाहिजे. तरच आपली मातृभाषा टिकू शकेल, असे विचार माजी प्राचार्य आनंद मेणसे यांनी शतकमहोत्सव सांगता सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. कंग्राळी खुर्द मराठी प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर महोत्सव कार्यक्रमप्रसंगी तरुणासाठी प्रेरणादायी व्याख्यानामध्ये आजच्या तरुणांची दिशा व दशा व मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

Advertisement

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक टी. डी. पाटील होते. मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सांगताना आनंद मेणसे पुढे म्हणाले, आज चीन, जपान, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड हे देश मातृभाषेतूनच शिक्षणाला अधिक खर्च करतात. तसेच याच देशांचे क्रीडा क्षेत्रामध्ये ऑलंम्पिकपटू देशाचे नाव अजरामर करतात तसेच हे देश बाल शिक्षणावर अधिक खर्च करतात. यामुळे या देशातील मुले शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये जगामध्ये अव्वल असतात आपल्या भारत देशाने सुद्धा हीच प्रणाली वापरल्यास भारत देशाचे सुद्धा सोने होईल, असे म्हणाले. आजच्या तरुणांची दिशा व दशा या विषयावर बोलताना मेणसे पुढे म्हणाले, मुलांची संगत चांगल्या अभ्यासू मुलाबरोबर झाली तर तीही तशीच हुषार बनतात. अर्धशिक्षित व अभ्यासामध्ये मागे असणाऱ्या मुलाबरोबर संगत केल्यास ती वेगळ्या अवैद्ध व्यवसायाकडे वळतात. यामुळे साहजिकच गांजा, दारू इतर नशेच्या व्यसनाकडे वळतात. पैशासाठी एकवेळ ती आई-वडील व घरातील माणसांच्यावर दांडगाई करण्यास सुद्धा मागेपुढे पहात नाहीत.

शिक्षण झाले महाग

आज प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्याचा विसर पडल्यामुळे इंग्लीश माध्यमासारख्या महागड्या शिक्षणाच्या मागे फिरावे लागत आहे. यामुळे शिक्षण महाग झाले म्हणावे लागत आहे. तसेच शिक्षणाचे खासगीकरण झाले आहे आणि यामुळेच आता शिक्षण विकत घ्यावे लागत आहे. यामुळे आपल्या मायबोलीला सोडून परकीय माध्यमाच्या शिक्षणाच्या मागे लागू नका, असेही विचार त्यांनी व्यक्त केले.

शाळेच्या शंभरीबरोबर याच शाळेतील 80, 90 वर्षे पार केलेल्या माजी ज्येष्ठ विद्यार्थ्यांचाही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जवळजवळ 50 हून अधिक ज्येष्ठ माजी अमृतमहोत्सवी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्कंडेय सोसायटी व जनलोकसेवा सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सरस्वती फोटो पूजन, महात्मा जोतिबा फुले, सावित्री फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटो पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवप्रतिमेचे पूजन पै. कल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र डॉ. पांडूरंग जाधव, डॉ. अरविंद भष्मे, डॉ. जत्ती, चिगरे गुरुजी, हभप मनोहर निलजकर यांच्यासह कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र हुतात्मा जवान जगदीश शिंदे व हुतात्मा जवान वामन जाधव यांच्या कुटुंबीयांना स्मरणिका चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दुपारी दुसऱ्या सत्रामध्ये माजी विद्यार्थी शाळेविषयी आठवणी व भावना मनोगत कथनमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतशील शेतकरी कृष्णा जाधव, उपप्राचार्या चिंतामण कॉलेज भारती पाटील, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता पाटील, शिक्षणप्रेमी श्रीकांत कडोलकर यांच्या उपस्थितीत शाळेच्या आठवणी व मनोगत कथन केले.

संध्याकाळी 5.30 ते 9 पर्यंत धनलक्ष्मी मंगळागौर समूह व तारांगण मंगळागौर समूह यांच्या हरिनाम भजनी व भावगीतांचा सुमधूर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा सुधारणा कमिटी माजी विद्यार्थी संघटना, सर्व तरुण मंडळे, महिला मंडळे, शिवजयंती उत्सव मंडळे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, स्त्राr शक्ती संघ शाळेचे शिक्षक वृंद व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी पी. जी. पाटील, शिवाजी जाधव, किसन पाटील यानी सूत्रसंचालन केले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Advertisement
Tags :

.