नीट परीक्षेतही विद्यार्थ्याला जानवे काढण्याची सूचना
कलबुर्गी येथील परीक्षा केंद्रातील घटनेने संताप : ब्राम्हण समाजाकडून आंदोलन
प्रतिनिधी/ बेंगळूर
सीईटी परीक्षा देण्यासाठी आलेल्या ब्राम्हण विद्यार्थ्याचे जानवे काढल्याचे प्रकरण ताजे असतानाच नीट परीक्षेतही अधिकाऱ्यांनी ब्राम्हण विद्यार्थ्याला जानवे काढण्यास सांगितले. कलबुर्गीच्या सेंट मेरी शाळेतील केंद्रात परीक्षा देण्यासाठी आलेला विद्यार्थी श्रीपाद पाटील याला अधिकाऱ्यांनी जानवे काढून परीक्षा देण्यास परवानगी दिली.
परीक्षा केंद्रात जात असताना श्रीपाद पाटील याला जानवे काढण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, सूचनेनुसार श्रीपाद पाटील याने जानवे काढून परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा दिली. या घटनेबद्दल अधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त करत परीक्षा केंद्राबाहेर ब्राम्हण समाजाने आंदोलन केले. जानवे काढण्यास सांगितलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, अशी मागणी समाजाने केली.
सीईटी परीक्षेवेळीही काढले होते जानवे
अलीकडेच झालेल्या सीईटी परीक्षेदरम्यान, शिमोगा, बिदर आणि धारवाड येथील परीक्षा केंद्रांवर ब्राम्हण विद्यार्थ्यांचे जानवे काढण्यात आले होते. या प्रकरणामुळे राज्यभर व्यापक चर्चा आणि संताप निर्माण झाला. जानवे घातल्याने परीक्षा देण्यास परवानगी न दिल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्मयात आणल्याबद्दल आक्रोशही व्यक्त करण्यात आला होता.