Kolhapur news | शाहू स्टेडियम परिसरातील जलतरण तलावात दुर्घटना; पाण्याचा अंदाज न आल्याने १८ वर्षीय तरुणाने गमावला जीव
शाहू स्टेडियम टँकमध्ये पोहताना १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
कोल्हापूर : बिहारमधून अकरावीतप्रवेश घेण्यासाठी कोल्हापुरात आलेल्या अभिनंदनकुमार राजेशकुमार सिंह (वय १८, रा. खाटोपूर, जि. दरभंगा) याचा टँकमध्ये पोहताना बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे. बिहारमधील खाटोपूर येथील अभिनंदनकुमार सिंह हा अकरावीत प्रवेश घेण्यासाठी कोल्हापुरात आला होता. नागाळा पार्क येथील एका महाविद्यालयात त्याने प्रवेशासाठी अर्जही केला होता. दरम्यान, रविवारी सायंकाळी शाहू स्टेडियम परिसरातील
अकरावी प्रवेशासाठी कुटुंबासह आला होता कोल्हापुरात टैंक, जलतरण तलावावर पोहण्यासाठी गेला. त्याने खोल पाणी असलेल्या ठिकाणी सूर मारला. पण पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. अभिनदंनकुमार हा बडील राजेशकुमार सिंह आई आणि बहिणीसह कोल्हापुरात न्यू शाहूपुरी परिसरात राहत होता. अभिनंदनकुमार पोहता येत होते. पण टँकवर पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.