करिश्मा राऊळ हिची श्नायडर इलेक्ट्रिकमध्ये निवड
सावंतवाडी भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी....
सावंतवाडी । प्रतिनिधी
येथील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्ष इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी (डिप्लोमा विभाग) करिश्मा प्रकाश राऊळ, रा.नेमळे, ता.सावंतवाडी हिची पुणे येथील श्नायडर इलेक्ट्रिक या कंपनीत कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड झाली आहे. श्नायडर इलेक्ट्रिक ही फ्रान्स येथे मुख्यालय असलेली आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी असून भारतात पुणे येथे तिचा प्रकल्प आहे. एनर्जी टेक्नॉलॉजी, क्लाऊड कनेक्टिंग कंट्रोल्स व प्रॉडक्ट्स, सॉफ्टवेअर सर्व्हिसेस याचसोबत कंपनी मॅनेजमेंट, डेटा सेंटर्स व इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर या विविध क्षेत्रात ही कंपनी सेवा पुरवते.
करिश्मा राऊळ हिला कंपनीतर्फे वार्षिक रु.3,75,000 पॅकेज प्राप्त झाले असून तिने मिळवलेल्या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी तिचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्राध्यापक डी . डी . पाटील, ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. मिलिंद देसाई, प्रा.श्रुती हेवाळेकर व प्रा. स्वप्निल राऊळ उपस्थित होते.