महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कळंबीजवळ पिकअपच्या धडकेत विद्यार्थी ठार! पोलीस भरतीच्या सरावासाठी जाताना अपघात, तिघे जखमी

12:16 PM Feb 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

मिरज प्रतिनिधी

पोलीस भरतीच्या सरावासाठी मोटारसायकलीवऊन जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव पिकअप चारचाकीची धडक बसल्याने विद्यार्थी जागीच ठार झाला. शिरीष अमसिद्ध खंबाळे (वय 21, रा. भोसे) असे मयत तऊणाचे नांव आहे. तर विश्वजीत विजय मोहिते (वय 24), प्रथमेश उत्तम हराळे (वय 24 दोघे रा. भोसे) आणि प्रज्वल साळुंखे (वय, 24 रा. कसबे डिग्रज) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कळंबीच्या हद्दीत रत्नाfिगरी-नागपूर महामार्गावर हा अपघात झाला. याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी, मयत शिरीष व त्याचे अन्य तिघे मित्र असे चौघेजण पोलिस भरतीसाठी प्रयत्न करीत होते. रविवारी पहाटे जिल्हा क्रीडा संकुलावर सराव होता. त्यामुळे दोन दुचाकींवऊन चौघे तऊण मिरजेकडे येत होते. सदर चौघे तऊण रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावऊन कळंबी गावच्या हद्दीत आले असता पाठीमागून पिकअप चारचाकी (एमएच-17-सीव्ही-0141) भरधाव वेगात आली. या चारचाकीने तऊणांच्या दोन्ही दुचाकींना जोराची धडक दिली. चारचाकीसोबत खरडत जावून डिव्हायडरला धडक बसल्याने शिरीष खंबाळे हा जागीच ठार झाला. तर विश्वजीत मोहिते, प्रथमेश हराळे, प्रज्वल साळुंखे हे तिघे जखमी झाले.

Advertisement

अपघात झाल्याचे कळताच स्थानिक ग्रामस्थांनी बचाव कार्यासाठी धांव घेतली. सर्व जखमींना तातडीने मिरज शासकीय ऊग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण पोलिसांनीही अपघातस्थळाचा पंचनामा केला. मयत खंबाळे याच्या मृतदेहावर शासकीय ऊग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत शिरीषसह त्याचे अन्य मित्र गेल्या काही वर्षांपासून पोलिस भरतीसाठी प्रयत्न करीत होते. विविध परीक्षाही त्यांनी दिली होती. जिल्हा क्रीडा संकुल तसेच मिरज-कृष्णाघाटावर पहाटेचा सराव असल्याने ते आठवड्यातून तीन ते चारवेळा मिरज व सांगलीला यायचे. मात्र, रविवारची पहाट शिरीषसाठी शेवटची ठरली. प्रचंड मेहनत आणि जिद्दीने पोलिस भरतीची परीक्षा देऊन सराव करत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. उमद्या तऊणाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे भोसे गावावर शोककळा पसरली होती.

भाजपा नेत्या सुमनताईंकडून जखमींची विचारपूस
पोलिस भरतीच्या सरावासाठी जाणाऱ्या तऊणांचा अपघात झाल्याचे समजल्यानंतर भाजपानेत्या सुमनताई खाडे यांनी मिरज शासकीय ऊग्णालयात येऊन नातेवाईकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिघाही जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. महामार्गावरील अनियंत्रित वेगवान वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याचा आरोप करत जखमींना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. यावर जखमी विद्यार्थ्यांना पोलीस भरती होण्यासाठी तसेच उपचाराचा खर्च शासकीय योजनेतून मिळवून देण्यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही यावेळी सुमनताईंनी नातेवाईकांना दिली.

Advertisement
Tags :
Kalambi police recruitment exerciseStudent killed
Next Article