For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Trupti Ghodmise | सिंधुदुर्गमध्ये ‘स्टुडंट कट्टा’; जिल्हाधिकाऱ्याशी मुलांच्या मनमोकळ्या संवादाची अनोखी भेट

03:38 PM Feb 17, 2026 IST | NEETA POTDAR
trupti ghodmise   सिंधुदुर्गमध्ये ‘स्टुडंट कट्टा’  जिल्हाधिकाऱ्याशी मुलांच्या मनमोकळ्या संवादाची अनोखी भेट
Advertisement

                                            सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांशी मुलांचे कुतूहलपूर्ण संवाद

Advertisement

सिंधुदुर्ग -भेदरलेले चेहरे, कुतूहलानं भरलेल्या नजरा अन् पाठीवरचं दप्तर पण आजची शाळा रोज भरणारी नव्हती तर जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आसुसलेल्या लहानग्यांची होती. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतीक्षा कक्षात बसलेल्या या चिमुरड्यांच्या कानावर बेलचा आवाज पडतात कान टवकारले गेले आणि शिपाई मामा म्हणाले, चला मुलांनो आत बोलवलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ म्हराठी शाळेच्या शिक्षकांनं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घडवून आणली, या भेटीत मुलांनी जिल्हाधिकाऱ्यांची मुलाखत घेतली, मुलाखतीत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसेही भारावल्या, जिल्हाधिकारी कार्यालयात भरलेल्या या अनोख्या स्टुडंट कट्ट्याची चर्चा मात्र जिल्हाभर सुरू आहे.

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जिज्ञासा आणि समाजाबद्दलची जाण निर्माण व्हावी या उद्देशाने चौकुळ नं. 4मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘स्टुडंट कट्टा’ या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची विशेष मुलाखत घेतली. लहान वयातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध कुतूहलपूर्ण प्रश्नांना जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत साध्या, सुटसुटीत आणि बालमैत्रीपूर्ण शब्दांत उत्तरे देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

Advertisement

सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ नं. 4 चे उपक्रमशील शिक्षक जावेद तांबोळी यांनी शाळेमध्ये स्टुडन्ट कट्टा हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत विविध मान्यवरांच्या मुलाखती या कट्ट्यावर घेण्यात येतात. यावेळी स्टुडंट कट्ट्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. 'जिल्हाधिकारी काय काम करतात?', कार्यालयात रोज कोणते निर्णय घेतले जातात?, आपण मोठे झाल्यावर प्रशासनात कसे काम करू शकतो?, जिल्हाधिकारी होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? असे प्रश्न केले. तर जिल्हाधिकारी यांनी या बालचमुना समजेल अशा सोप्या शब्दात या प्रश्नांची उत्तरे दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन देत शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.

Advertisement
Tags :

.