For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मागणीनुसार विद्यार्थी वसतिगृहांची पूर्तता

10:38 AM Dec 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
मागणीनुसार विद्यार्थी वसतिगृहांची पूर्तता
Advertisement

मागासवर्ग कल्याण मंत्री शिवराज तंगडगी यांचे विधानसभेत आश्वासन

Advertisement

बेळगाव : बागलकोट जिल्ह्यातील तेरदाळ विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील महालिंगपूर, रबकवी, बनहट्टी येथे नव्याने विद्यार्थी वसतिगृह सुरू करण्याची मागणी तेरदाळचे आमदार सिद्धू सवदी यांनी बुधवारी विधानसभेत केली. मागणीनुसार विद्यार्थी वसतिगृह सुरू करण्यात येतील, असे आश्वासन मागासवर्ग कल्याण मंत्री शिवराज तंगडगी यांनी दिली. तेरदाळ मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात सध्या पाच विद्यार्थी वसतिगृहे कार्यरत आहेत. आणखी पाच वसतिगृहांची मागणी आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या अनुकुलतेसाठी ती त्वरित सुरू करावीत, अशी मागणी आमदारांनी केली. अनुदानाची उपलब्धता व वसतिगृहांची मागणी लक्षात घेऊन नवे वसतिगृह मंजूर करण्यात येतील, असे मंत्री शिवराज तंगडगी यांनी सांगितले.

भाडोत्री इमारतीतील अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत

Advertisement

दरम्यान,भाडोत्री इमारतीत सुरू असलेल्या अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. इळकलचे आमदार विजयानंद काशप्पन्नावर यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, इळकल व हुनगुंद तालुक्यात शंभर अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत आहेत. अनुदानाची उपलब्धता लक्षात घेऊन स्वतंत्र इमारती उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. हुनगुंद तालुक्यातील 358 अंगणवाड्यांपैकी 217 स्वत:च्या इमारतीत आहेत. 41 अंगणवाड्या भाडोत्री इमारतीत आहेत. दोन तालुक्यात शंभर अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यात 3 हजार 500 अंगणवाड्या भाडोत्री इमारतीत आहेत. स्वतंत्र इमारतीसाठी महसूल खात्याला पत्र पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पाच विधेयके संमत

बुधवारी सायंकाळी विधानसभेत पाच विधेयके पारित करण्यात आली. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मांडलेले बेंगळूर महानगर भूपरिवर्तन प्राधिकरण दुरुस्ती विधेयक, मंत्री रामलिंगारेड्डी यांच्यातर्फे एच. के. पाटील यांनी मांडलेले बॉम्बे सार्वजनिक न्यास दुरुस्ती विधेयक, कर्नाटक राज्य रस्ते सुरक्षितता प्राधिकार दुरुस्ती विधेयक, आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी मांडलेले 2025 चे औषध व प्रसाधन सामग्री दुरुस्ती विधेयक, महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांच्यामार्फत मंत्री एच. के. पाटील यांनी मांडलेले नाडप्रभू केम्पेगौडा पारंपरिक ठिकाण विकास प्राधिकरण दुसरे दुरुस्ती विधेयक पारित करण्यात आले.

Advertisement
Tags :

.