For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ताराराणी स्कूलच्या खेळाडूचे कराटे स्पर्धेत यश

10:33 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
ताराराणी स्कूलच्या खेळाडूचे कराटे स्पर्धेत यश
Advertisement

खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूलच्या तीन विद्यार्थिनींनी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप देहरादून येथे शॉर्ट नॉन कराटे डू स्पोर्ट्स असोसिएशन इंडिया यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत खानापूर ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 1200 स्पर्धकांनी भाग घेतला होता. नेपाळ, भूतान, श्रीलंका व स्वीडन या देशातील स्पर्धकांचाही समावेश होता. या स्पर्धेमध्ये  गायत्री प्रशांत गुरव, प्रांजली ईश्वर पाटील व अदिती प्रशांत गुरव या सर्व विद्यार्थिनींना सुवर्णपदक मिळाविले आहेत.या विद्यार्थिनीचा, पालक वर्गाचा व प्रशिक्षकांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक राहुल एन. जाधव, क्रीडा शिक्षिका अश्विनी टी. पाटील, प्रशिक्षक लक्ष्मण नायक व मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांचे मौलिक मार्गदर्शन व प्रोत्सहान लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.