आचरा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ३० जूनला विद्यार्थी सत्कार सोहळा
आचरा प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीच्या वतीने दहावीच्या परिक्षेत आचरा परिक्षा केंद्रात पहिल्या तीन क्रमांकानी उत्तीर्ण होणाऱ्या व मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञन व समाज शास्त्र विषयान सर्वाधिक गूण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच बारावीच्या परिक्षेत कला व वाणिज्य विभागात पहिल्या तीन क्रमांकानी उत्तीर्ण होणाऱ्या व मराठी, इंग्रजी या विषयात केंद्रात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार 30 जून रोजी आचरा जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित केला आहे.न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथील परिक्षा केंद्रावर आचरा हायस्कूल सह रामेश्वर विद्यामंदिर पिरावाडी, ज्ञानदिप विद्यालय वायंगणी, जनता विद्यालय त्रिंबक, आर ए यादव हायस्कूल आडवली, भगवती हायस्कूल मुणगे या हायस्कूल विद्यार्थी परिक्षा देतात. फेब्रुवारी - मार्च 202५ मध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेत या सहाही हायस्कूलचा १००% निकाल लागला आहे. तसेच बारावीच्या परिक्षेला कला विभागातून ४० विद्यार्थी परिक्षेला बसले व वाणिज्य विभागातून ७१ विद्यार्थी परिक्षेला बसले होते यांचाही १००% निकाल लागला आहे. यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार असून संबंधित विद्यार्थ्यांना पत्रे पाठविण्यात आली असून जे विद्यार्थी बाहेरगावी गेले असल्यास त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमाला वेळी उपस्थित राहून बक्षिसांचा स्विकार करावा असे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा कडून आवाहन करण्यात आले आहे.