For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अश्लिल व्हिडिओव्दारे धमकावून विद्यार्थी डॉक्टरकडून बलात्कार

03:52 PM Jun 11, 2025 IST | Radhika Patil
अश्लिल व्हिडिओव्दारे धमकावून विद्यार्थी डॉक्टरकडून बलात्कार
Advertisement

सांगली :

Advertisement

वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी डॉक्टरने दवाखान्यातीलच सहाय्यक महिलेला तिच्याशी शारीरिक संबंधांचे व्हिडीओ प्रसारीत करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची फिर्याद विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झाली असून त्यानुसार डॉ. हर्ष राजेंद्र चोरारीया (28, मूळ रा. मुंबई) याच्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. हर्ष याने त्याच विभागातील एका 31 वर्षीय सहाय्यक महिलेशी ओळख वाढवली आणि त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार डॉक्टरने याचे व्हिडीओ बनवून तिला धमकावण्यास सुरूवात केली. 2024 सालापासून जवळपास वर्षभर तिला हॉटेल पर्ल आणि साई डिलक्स येथे बोलावून तिच्यावर अत्याचार चालवले. अखेर ब्लॅकमेलिंगला कंटाळून संबंधित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला.

Advertisement

पोलिसांनी याबाबत माहिती घेऊन खात्री झाल्यानंतर डॉक्टर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी त्याला अटक झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

  • महिन्यात दुसरा, वर्षात पाचवा प्रकार

विद्यार्थी डॉक्टरांकडून आपल्याच सहकारी डॉक्टर युवतीला गुंगीचे औषध पाजून गँगरेप केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून याप्रकरणाचा तपास अद्याप सुरू असतानाच आणखी एका विद्यार्थी डॉक्टरच्या बलात्काराचे प्रकरण पुढे आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. वर्षभरात अशा पाच घटना घडल्या असून अशा घटनांमुळे सांगली शहराची बदनामी होत असल्याने संबंधितांनी हे प्रकरण अत्यंत गांभिर्याने घ्यावे अशी शहरवासियांतून मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.