महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांदा केंद्र शाळेत विद्यार्थी दिवस साजरा

04:24 PM Nov 08, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

प्रतिनिधी
बांदा

Advertisement

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी या दिवशी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या प्रतापसिंह हायस्कूल येथे शाळा प्रवेश घेतला होता . डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक वाटचाल खूपच रोमहर्षक आहे.हुशार,कुशाग्र बुध्दीमत्ता यासारख्या अनेक पैलूंमधून आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वर्णन करतो. आंबेडकर यांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले होते. हा ऐतिहासिक दिवस विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जातो. हा दिवस बांदा केंद्र शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला .

Advertisement

या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यार्थी दिशेची वेशभूषा शाळेतील निल नितीन बांदेकर या विद्यार्थ्यांने साकारली.  यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारावर शाळेतील शिक्षकांनी औक्षण करून‌ बाबासाहेब यांच्यावर‌ पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी निल बांदेकर यांनी मी बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मवृत्त आपल्या भाषणातून कथन केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे सामुहिक वाचन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांसह सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# banda # Student Day Celebration at Banda
Next Article