For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोटा शहरात विद्यार्थिनीची आत्महत्या

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोटा शहरात विद्यार्थिनीची आत्महत्या
Advertisement

वृत्तसंस्था /कोटा

Advertisement

मध्यप्रदेशच्या रीवा येथील विद्यार्थिनी राजस्थानच्या कोटा येथे राहून ‘नीट’ची तयारी करत होती. 4 जून रोजी नीट-युजीचा निकाल लागला होता, ज्यात तिला कमी गुण मिळाले होते. यातून आलेल्या नैराश्याच्या भरात विद्यार्थिनीने इमारतीच्या 9 व्या मजल्यावरून उडी घेत स्वत:चे आयुष्य संपविले आहे. कोटा येथे बागिशा तिवारी (18 वर्षे) ही पुखराज एलिमेंट इमारतीच्या 5 मजल्यावर आई आणि भावासोबत राहत होती. बागिशा एक वर्षापासून ‘नीट’ची तयारी करत होती. तिचा भाऊ 11 वी शिकत असून तो जेईईची तयारी करत आहे. नीट-युजीमध्ये अपेक्षित कामगिरी करता न आल्याने बागिशाला नैराश्य आले हेते. यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. बागिशाला आत्महत्या करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न एका महिलेने  केला होता, परंतु यात यश आले नव्हते. जखमी झालेल्या बागिशाला त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. कोटा येथे चालू वर्षात आतापर्यंत 11 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.