महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बसमधील सीटवर बसण्यावरून विद्यार्थिनीला मारहाण

12:13 PM Jan 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मध्यवर्ती बसस्थानकावर घटना : तिघांविरोधात गुन्हा

Advertisement

बेळगाव : परिवहनच्या बसमधील सीटवर बसण्यावरून झालेल्या वादावादीनंतर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला तिघा जणांनी अर्वाच्च शब्दात शिविगाळ करण्यासह मारहाण केल्याची घटना सोमवार दि. 13 रोजी सायंकाळी 7.15 च्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकावर घडली आहे. याप्रकरणी कौशल्या महालिंगप्पा यळवत्ती (वय 21, रा. बम्मीगट्टी, ता. कलघटगी, जि. धारवाड) हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मोहम्मदअजिम मेहबूबसाब सवनूर, शहनाज मेहबूबसाब सवनूर आणि करिष्मा मेहबूबसाब सवनूर (तिघेही रा. हुबळी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी कौशल्या ही राणी चन्नम्मा विद्यापीठात एमएस्सी क्रिमिनॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्स विभागातील पहिल्या वर्षात शिकत आहे. त्यामुळे ती दररोज परिवहनच्या बसमधून बेळगावला ये-जा करत होती.

Advertisement

सोमवारी सायंकाळी 7.15 च्या दरम्यान ती आपली मैत्रीण अक्षता मळेगाव (रा. धारवाड) आणि वर्ष हेब्बळ्ळी (रा. धारवाड) या दोघांसमवेत कॉलेज संपवून आपापल्या गावी जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकावर आले. बेळगावहून धारवाड मार्गे बळ्ळारीला जाणारी बस येताच कौशल्या बसमध्ये चढली व सीटवर जाऊन बसली. सदर सीटवर आधीच काहींनी एका ठिकाणी पाण्याची बॉटल तर दुसऱ्या सीटवर पिशवी ठेवली होती. त्यामुळे कौशल्या रिकाम्या असलेल्या तिसऱ्या सीटवर बसली. काहीवेळानंतर एक महिला त्याठिकाणी आली आणि आम्ही तिघेजण आहे. त्यामुळे तू येथून उठ असे सांगितले. त्यावर मी तुमच्यासाठी दोन सीट सोडल्या आहेत. त्याठिकाणी तुम्ही बसा, असे सांगितल्यानंतर त्याठिकाणी थांबलेल्या दोघी महिलांसह एका पुरुषाने कौशल्याबरोबर भांडण काढून अर्वाच्च शब्दात शिविगाळ करत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. यामध्ये कौशल्याच्या मोबाईलचे नुकसान झाले असून तिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून घेऊन पोलिसांनी तपास चालविला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article