Kolhapur : दिवाळीनंतर परतीच्या प्रवासात एसटीच्या कोल्हापूर विभागाचा उच्चांक
सात लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक; 3 कोटी 91 लाखांचा महसूल
कोल्हापूर : दिवाळी सणानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने विशेष वाहतूक नियोजन केले होते. या नियोजनाद्वारे विभागाने ७ लाख ८३ हजार ६४७ प्रवाशांचा परतीचा प्रवास सुखकर व सुरक्षितरित्या केला. यामुळे विभागाच्या खात्यात तब्बल ३ कोटी ९१ लाख ८ हजार रुपयांचा महसूल जमा झाला असून, ही कामगिरी कोल्हापूर विभागासाठी यशस्वी उच्चांक ठरली आहे.
दिवाळीनंतर प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन विभागाने दिनांक २५ ते २७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आगाऊ नियोजन केले. नियमित बससेवेसोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त जादा बसेस चालविण्यात आल्या. मुंबई, बोरिवली, पुणे, निगडी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, रत्नागिरी, अक्कलकोट, बार्शी, लातूर व बेळगाव या प्रमुख शहरांहून कोल्हापूरकडे आलेल्या प्रवाशांना परतीसाठी सहज सेवा उपलब्ध झाली. या काळात विभागाने ९ प्रवाशांना गर्दी, विलंब किंवा गैरसोयीशिवाय लाख ४६ हजार किलोमीटरचे बसचालन करून वाहतूक यशस्वीपणे पार पाडली. परिणामी, सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेता आला.
सांघिक प्रयत्नांमुळे प्रवासी समाधानी, विश्वासात वाढ
या यशामागे कोल्हापूर विभागातील १२ आगारांतील चालक, वाहक, यांत्रिक, पर्यवेक्षक आणि अधिकारीवर्गाचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या समन्वय, जबाबदारी आणि वेळपालनामुळे प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळाली. प्रवाशांकडून राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान आणि कौतुक व्यक्त करण्यात येत असून, यामुळे महामंडळावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. विभाग नियंत्रकांनी सांगितले की, प्रवाशांची सुरक्षितता आणि समाधान हे आमचे प्रमुख ध्येय आहे. भावी काळात आणखी सुधारित, आधुनिक व दर्जेदार सेवा पुरविण्याचा आमचा संकल्प
प्रवासी संख्या :
७,८३,६४७
महसूल : ३,९१,०८,०००
॥ बसचालन अंतर : ९,४६,०००
कालावधी : २५ ते २७ ऑक्टोबर २०२५
आगारांची संख्या : १२