For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायल-अमेरिकेविरुद्ध काश्मीरमध्ये निदर्शने

06:19 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
इस्रायल अमेरिकेविरुद्ध काश्मीरमध्ये निदर्शने
Advertisement

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिह्यातील किंतूर गावातही शोककळा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इराणी सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी काश्मीरमधील हजारो शिया मुस्लीम रस्त्यावर उतरलेले दिसून आले. रविवारी सकाळीच श्रीनगरच्या मुख्य चौकात लाल, काळे आणि पिवळे झेंडे घेऊन लोक एकत्र जमले होते. त्यांनी इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध घोषणाबाजी करत शहरातील मुख्य रस्त्यावरून फेरीही काढली. जम्मू काश्मीरसोबतच उत्तर प्रदेशमध्येही या प्रकरणाचे पडसाद उमटले. इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिह्यातील किंतूर गावात शोककळा पसरली. खामेनेईंचे आजोबा सय्यद अहमद मुसावी यांचे मूळ या गावाशी संबंधित असल्याची माहिती आहे.

Advertisement

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना या घटनेचे पडसाद भारतातही उमटले आहेत. विशेषत: उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिह्यातील किंतूर हे छोटेसे गाव शोकाकुल झाले आहे. बाराबंकीच्या सिरौली गौसपूर तहसीलमधील किंतूर गावाचा खामेनी कुटुंबाशी ऐतिहासिक संबंध असल्याचे बोलले जाते.

Advertisement

.