For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : सोलापूर निवडणुकीत सोशल मीडियाचा जोरदार वापर!

06:32 PM Dec 24, 2025 IST | NEETA POTDAR
solapur news   सोलापूर निवडणुकीत सोशल मीडियाचा जोरदार वापर
Advertisement

                                   सोलापूरमध्ये निवडणूकपूर्वी उमेदवारांचे डिजिटल युद्ध

Advertisement

सोलापूर : सोलापूर भाजप, शिंदेसेनेचे उमेदवार, त्यांचे नेते सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. प्रभागात कोणताही उपक्रम केला की तो क्षणार्धात समाजमाध्यमांद्वारे सगळ्या फॉलोअर्सना पाठवला जात आहे. केवळ इच्छुक उमेदवारच नव्हे तर त्या पक्षांचे नेतृत्व देखील प्रचंड नेटसॅव्ही असल्याने अतिशय वेगाने त्यांचे कार्यक्रम, संदेश सर्वदूर पाठवले जातात. आता तर एआयचा वापर त्या पक्षांनी सुरू केला आहे.

भाजपसह सर्वच पक्षाच्या सोशल मीडिया हँडलर्स हे प्रत्येक कार्यक्रम, सभा यांची माहिती सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. प्रत्येक लहान पक्षाची सोशल मीडिया टीम प्रचंड सक्रिय असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येते. राज्यासह दिल्ली आणि प्रसंगी परदेशातही दौरे असले की ती टीम त्यांच्यासमवेत असते. त्यांच्याकडून व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टा अशी सर्व अकाउंट एकावेळी हँडल केली जातात. बहुतांश उपक्रम लाईव्ह सुरू असल्याने त्यांच्या फॉलोअर्सना माहिती लगेच मिळत आहे. शिंदेसेना, बसपा, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यासह अन्य पक्षांच्या माध्यमातून सोशल मीडिया सांभाळणाऱ्या टीम स्वतंत्र काम करीत आहेत.

Advertisement

सर्वच पक्षाच्याकडून सर्व्हे करून नागरिकांचा कौल आजमावला जात आहे. त्याचा फायदा आगामी काळात उमेदवारी देताना पक्ष नेतृत्व करणार, हे स्पष्ट आहे. इच्छुक उमेदवारांनीही त्यांना अपेक्षित असलेला सर्व्हे करून घेतला. अन्य पक्षातून भाजप, शिंदेसेनेत गेलेल्या इच्छुक उमेदवारांनी प्रवेशापूर्वी आणि आता प्रवेश केल्यावर असे दोन तीन वेळा सर्व्हे करून कौल जाणून घेतला जात आहे.

समाज माध्यमांचा फायदा
पालिका निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवार त्यांच्या प्रभागात सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्याचा तोच मार्ग बहुतेकांनी निवडला आहे. नागरिकांकडून आलेल्या सूचना, समस्या सोडवण्यासाठीदेखील समाजमाध्यमांचा फायदा त्यांना होतो.

Advertisement
Tags :

.