महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंडिया ड च्या डावाला दमदार सुरुवात

06:00 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/अनंतपूर

Advertisement

गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या 2024 च्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात खेळाच्या पहिला दिवसअखेर इंडिया ड ने पहिल्या डावात 77 षटकात 5 बाद 306 धावा जमविल्या. इंडिया ड तर्फे देवदत्त पडीकल, एस. भरत, रिकी भुई आणि संजू सॅमसन यांनी दमदार अर्धशतके जळकविली. इंडिया ब तर्फे राहुल चहरने 3, तर मुकेशकुमार आणि सैनी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. या सामन्यात इंडिया ब ने नाणेफेक जिंकून इंडिया ड ला प्रथम फलंदाजी दिली. देवदत्त पडिकल आणि भरत यांनी सलामीच्या गड्यासाठी 105 धावांची शतकी भागिदारी केली. इंडिया बच्या सैनीने ही सलामीची जोडी फोडताना पडिकलला तर त्यानंतर मुकेशकुमारने भरतला यष्टीरक्षक जगदीशन करवी झेलबाद केले. निशांत सिंधू 19 धावांवर बाद झाला. कर्णधार अय्यर चहरच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. त्यावेळी इंडिया ड ची स्थिती 4 बाद 175 अशी होती. रिकी भुईने सॅमसनसमवेत पाचव्या गड्यासाठी 41 धावांची भागिदारी केली.

Advertisement

इंडिया ड ने 200 धावांचा टप्पा ओलांडला.  चहरने भुईला बाद केल्याने इंडिया ड ची स्थिती 5 बाद 216 अशी झाली. त्यानंतर संजू सॅमसनने 83 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 89 धावा जमविल्या. सॅमसन आणि जैन यांनी सहाव्या गड्यासाठी अभेद्य 90 धावांची भागिदारी केली. कर्णधार अय्यर पुन्हा फलंदाजीत अपयशी ठरला. त्याला यावेळी आपले खातेही उघडता आले नाही. या स्पर्धेत अय्यरने गेल्या पाच डावात केवळ 104 धावा जमविल्या आहेत. सध्या बांगलादेश विरुद्ध चेन्नईत गुरुवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीसाठी अय्यरला वगळण्यात आले आहे. त्याला कदाचित आगामी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर किंवा पुढील महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी संघात संधी मिळू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संक्षिप्त धावफलक: इंडिया ड प. डाव 77 षटकात 5 बाद 306 (संजू सॅमसन खेळत आहे 89, पडिकल 50, भरत 52, भुई 56, चहर 3-60, सैनी 1-51, मुकेशकुमार 1-37)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article