मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार
12:09 PM Nov 17, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
पारंपरिक मच्छीमारांची ठाम भुमिका
Advertisement
मालवण -:
अवैध पर्ससीन मासेमारीविरोधात ठोस कारवाईसाठी पारंपरिक मच्छीमारांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू होते. जोपर्यंत पारंपरिक मच्छीमारांच्या पाच मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा ठाम पवित्रा पारंपरिक मच्छीमारांनी घेतला आहे. त्यामुळे मत्स्य विभागाचे अधिकारी आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उपोषणकर्त्यांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली.
Advertisement
Advertisement