For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पेसएक्सच्या आयपीओला दमदार प्रतिसाद, भारतीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी

07:00 AM Jun 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्पेसएक्सच्या आयपीओला दमदार प्रतिसाद  भारतीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी
Advertisement

देशातील पाच म्युच्युअल फंड स्पेसएक्स आयपीओसाठी चर्चेत

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

स्पेसएक्स आयपीओ सादर करण्यात आल्यानंतर या अवकाश क्षेत्रातील दिग्गज कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान यात भारतीय म्युच्युअल फंडचा समावेश राहणार आहे. दरम्यान स्पेसएक्स आयपीओ चर्चेत नॅसडॅक-100 ला ट्रॅक करणारे 5 भारतीय म्युच्युअल फंड या अवकाश कंपनीमध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्याची संधी देत आहेत. एलॉन मस्क-समर्थित स्पेसएक्सच्या आयपीओ योजनांनी जागतिक इंडेक्स-लिंक्ड गुंतवणूक उत्पादनांकडे, विशेषत: नॅसडॅक-100 ला ट्रॅक करणाऱ्या फंडांकडे लक्षणीय लक्ष वेधले आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, स्पेसएक्स सुमारे 75 अब्ज डॉलर्स उभारण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे हा जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या सार्वजनिक ऑफरिंगपैकी एक ठरेल. या आयपीओला सादरीकरणापूर्वीच चारपट दमदार प्रतिसाद मिळाला आहे. ही कंपनी 12 जून रोजी स्पेसएक्स या टिकर सिम्बॉल अंतर्गत पदार्पण करणार असल्याची अपेक्षा आहे. जर नॅसडॅक-100 चा इंडेक्समध्ये समावेश झाला, तर त्या बेंचमार्कला ट्रॅक करणाऱ्या पॅसिव्ह फंडांना शेअर्समध्ये भांडवल गुंतवावे लागेल, ज्यामुळे एरोस्पेस आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनमधील अप्रत्यक्ष गुंतवणूक वाढू शकते.

अॅक्सिस नॅसडॅक 100 फंड ऑफ फंड्स

अॅक्सिस म्युच्युअल फंडतर्फे, ‘अॅक्सिस नॅसडॅक 100 यूएस स्पेसिफिक इक्विटी पॅसिव्ह फंड ऑफ फंड्स“ नावाची योजना 1 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेने स्थापनेपासून 35.03 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल नॅसडॅक 100 इंडेक्स फंड आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडतर्फे, ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल नॅसडॅक 100 इंडेक्स फंड‘ नावाची योजना 18 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेने स्थापनेपासून 20.71 टक्के वार्षिक परतावा दिला असून, तिचा एयूएम 3,254 कोटी आहे.

इन्व्हेस्को नॅसडॅक-100 एफओएफ

इन्व्हेस्को म्युच्युअल फंडतर्फे, ‘इन्व्हेस्को इंडिया ईक्dयूक्यू नॅसडॅक-100 ईटीएफ फंड ऑफ फंड्स“ नावाची योजना 21 एप्रिल 2022 रोजी सुरू करण्यात आली. या फंडाने स्थापनेपासून 26.27 टक्के वार्षिक परतावा दिला असून, तो 445 कोटींच्या एयूएमचे व्यवस्थापन करतो. मोतीलाल ओसवाल नॅसडॅक-100 फंड ऑफ फंड्स मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडतर्फे, ‘मोतीलाल ओसवाल नॅसडॅक 100 फंड ऑफ फंड्स“ नावाची योजना नोव्हेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आली असून, तिने स्थापनेपासून 28.96 टक्के इतका वार्षिक परतावा दिला आहे आणि तिची एयूएम 12,814 कोटी आहे.

Advertisement
Tags :

.