मेटल समभागांमध्ये चांगली तेजी
06:49 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई:
Advertisement
भारतीय शेअर बाजारात घसरण असताना धातू किंवा मेटल क्षेत्रातील काही कंपन्यांनी चांगली कामगिरी केली होती. या क्षेत्रामधील वेदांता लिमीटेड, हिंडाल्को इंडस्ट्रीज आणि नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी (नाल्को) या कंपन्यांचे समभाग सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी इंट्रा डे दरम्यान 3 ते 6 टक्के इतके वाढलेले पहायला मिळाले. जागतिक बाजारामध्ये अॅल्युमिनियमच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीचा परिणाम धातू कंपन्याच्या समभागावर सोमवारी सकारात्मक पहायला मिळाला. लंडन मेटल एक्स्चेंजवर अॅल्युमिनियमच्या किमती 6 टक्के वाढत 3492 डॉलर प्रति टनवर पोहोचल्या होत्या.
Advertisement
Advertisement