बर्जर पेंटस्कडून रंग विक्रीत दमदार कामगिरी
06:55 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ कोलकाता
Advertisement
रंगोत्पादन क्षेत्रातील कंपनी बर्जर पेंट्सने आर्थिक वर्ष 2024 मध्ये दहा हजार कोटीहून अधिक रंगाची विक्री केली आहे. आर्थिक वर्षामध्ये रंग विक्री जवळपास सहा टक्के वाढीव राहिली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल-मार्च) करिता कंपनीने एक हजार कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे.
समभाग वधारण्याचा अंदाज
Advertisement
रंग उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये भारतामध्ये ही कंपनी दुसऱ्या नंबरवर आहे. गेल्या वर्षभरामध्ये कंपनीचा समभागदेखील वाढलेला असून आगामी काळातही हा समभाग वाढीच्या दिशेने सरकू शकतो असे काही तज्ञांनी मत नोंदवले आहे. वॉटरप्रूफिंग त्याचप्रमाणे बांधकामासाठी लागणाऱ्या केमिकल्सची मागणी दमदार राहिली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षांमध्ये सहा टक्के वाढीसह 10002.90 कोटी रुपयांचा रंग कंपनीने विकला आहे.
Advertisement