For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उमेदवारी अर्ज दाखल करताना संदेश पारकर यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

02:40 PM Oct 29, 2024 IST | अनुजा कुडतरकर
उमेदवारी अर्ज दाखल करताना संदेश पारकर यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
Advertisement

डीजे, ढोलताशांच्या गजरात काढलेल्या रॅलीत कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

Advertisement

कणकवली: वार्ताहर
उबाठा शिवसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार तथा उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन प्रदर्शन केले. यावेळी येथील गांगोमंदिर ते तहसील कार्यालय अशा डीजे, ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या पायी रॅलीत उबाठा शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व महाविकास आघाडीच्या घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रॅलीदरम्यान 'संदेशभाई आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणा घुमतच होती.

दुपारी ११.४५ वाजण्याच्या उमेदवार संदेश पारकर, महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकाऱ्यांचे गांगो मंदिर येथे आगमन झाले आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरु केला. डीजे, ढोलताशांच्या गजरात रॅलीला सुरुवात झाली. डीजेवर 'शिवसेना सॉंग' वाजू लागले आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. 'शिवसेना जिंदाबाद', 'जय शिवाजी'चा जोरदार गजर घुमू लागला.यावेळी खास सजविण्यात आलेल्या वाहनामधून उमेदवार संदेश पारकर यांच्यासह माजी आमदार परशुराम उपरकर, उबाठा शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेनाप्रमुख सुशांत नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर‌ आदी उपस्थितांना अभिवादन करत होते. रॅलीमध्ये महिला आघाडीप्रमुख नीलम पालव, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, रामदास विखाळे, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, बंडू ठाकूर,बबली राणे, संदीप कदम, विनायक मेस्त्री, उत्तम लोके, गणेश गांवकर, मिलिंद साटम, जयेश नर, मंगेश लोके, राजू रावराणे, सिद्धेश राणे, फरीद काझी‌ आदी सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.