दुचाकी , प्रवासी वाहनांची मजबूत मागणी
नवी दिल्ली :
देशातील आव्हानात्मक व्यावसायिक वातावरणात दुचाकी आणि प्रवासी वाहनांच्या जोरदार मागणीमुळे 2024 मध्ये मोटार वाहनांच्या किरकोळ विक्रीत वार्षिक नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्ष 2023 मधील 2,39,28,293 युनिट्सच्या तुलनेत 2024 मध्ये एकूण वाहन नोंदणी 2,61,07,679 युनिट्स होती, असे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (फाडा)ने एका निवेदनात म्हटले आहे.
फाडाचे अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘2024 मध्ये, प्रखर उष्णता, केंद्रीय आणि राज्यांच्या निवडणुका आणि अनियमीत पावसाळ्यासह प्रतिकूल परिस्थिती असूनही ऑटोमोटिव्ह रिटेल उद्योग मजबूत आहे.
ते म्हणाले की जरी वित्तीय मर्यादा आणि वाढती इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) स्पर्धेची आव्हाने असली तरी सुधारित पुरवठा, नवीन मॉडेल्स आणि दुचाकी विभागातील मजबूत ग्रामीण मागणीमुळे वाढीस चालना मिळाली. 2024 मध्ये प्रवासी वाहनांची विक्री 40,73,843 युनिट्सवर होती, जी 2023 मधील 38,73,381 युनिट्सपेक्षा पाच टक्के अधिक आहे. दुचाकी वाहनांची विक्री वार्षिक 11 टक्क्यांनी वाढून 2024 मध्ये 1,89,12,959 युनिट्सवर पोहचली आहे. 2023 मध्ये ती 1,70,72,932 युनिट होती.
त्याचवेळी, तीनचाकी वाहनांची नोंदणी वर्षभरात 11 टक्क्यांनी वाढून 12,21,909 युनिट्सवर पोहोचली जी 2023 मध्ये 11,05,942 युनिट्स होती. ट्रॅक्टरच्या विक्रीत वार्षिक तीन टक्क्यांनी वाढ झाली. 94,112 युनिट्स, तर व्यावसायिक वाहनांची विक्री 10,04,856 युनिट्सवर स्थिर राहिली.
दुसरीकडे, डिसेंबर महिन्यात, फाडानुसार, मोटार वाहन क्षेत्राची किरकोळ विक्री वार्षिक 12 टक्क्यांनी घटून 17,56,419 युनिट झाली. डिसेंबर 2023 मधील 14,54,353 युनिट्सच्या तुलनेत डिसेंबर 2023 मध्ये दुचाकी नोंदणी 18 टक्क्यांनी घटून 11,97,742 युनिट्सवर आली. प्रवासी वाहनांची किरकोळ विक्रीही डिसेंबर 2023 मधील 2,99,351 युनिटच्या तुलनेत गेल्या महिन्यात दोन टक्क्यांनी घसरून 2,93,465 युनिट्सवर आली.