For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावमध्ये उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील : जगदीश शेट्टर

11:47 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावमध्ये उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील   जगदीश शेट्टर
Advertisement

व्यापारी-उद्योजकांशी साधला संवाद

Advertisement

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल केले आहेत. त्यामुळेच भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. बेळगावमध्येही अनेक नवीन प्रकल्प सुरू झाले असून नवीन प्रकल्प बेळगावमध्ये आणून रोजगार निर्मिती करण्याचा आपला पहिला प्रयत्न राहील, असा विश्वास भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. मंगळवारी सकाळी उद्यमबाग येथील फौंड्री क्लस्टरच्या सभागृहात बेळगावमधील व्यापारी व उद्योजकांशी त्यांनी संवाद साधला. बेळगावचे दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांनी आपल्या कार्यकाळात औद्योगिक क्षेत्राला मोठे सहकार्य केले. त्यामुळे बेळगाव औद्योगिक क्षेत्र देशभरात फौंड्री उद्योजकांसाठी ओळखले जाते. फौंड्री उद्योग जगभरात पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन शेट्टर यांनी केले. माजी आमदार संजय पाटील म्हणाले, बेळगावमधील व्यापारी, उद्योजक हे नेहमीच भाजपच्या पाठिशी उभे राहिले आहेत. भाजपने आजवर व्यापारवाढीसाठी ज्या योजना राबविल्या त्यामुळेच या वेळीहे बेळगावचे उद्योजक भाजपलाच साथ देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यातून बेळगाव जिल्ह्याचा औद्योगिक विकास करण्यासाठी नेहमीच प्रयत्न उमेदवार जगदीश शेट्टर करतील, असे त्यांनी सांगितले. जगदीश शेट्टर यांनी राज्याची धुरा समर्थपणे सांभाळल्यामुळे राज्याचा औद्योगिक विकास कसा होतो, याचा त्यांना अनुभव आहे. या अनुभवाचा  बेळगावच्या औद्योगिक विकासाला नक्कीच फायदा होईल, असे राष्ट्रीय ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डचे अध्यक्ष सुनील सिंग यांनी सांगितले. यावेळी उद्योजक नरेंद्र गाधीया यासह बेळगावमधील व्यापारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.