For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | दुचाकीवरून घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अचानक आला पट्टेरी वाघ अन्...

02:18 PM Jun 23, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   दुचाकीवरून घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अचानक आला पट्टेरी वाघ अन्
Advertisement

तुडये :तुडये-यशवंतनगर मार्गावरील हाजगोळी गावाच्या हद्दीतील मडवळ कोंड नाल्याजवळ सोमवारी पहाटे पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हा बाघ वनविभागाच्या बेस कॅम्पपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेची भावना अधिक तीव्र झाली आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेपासूनच परिसरात बाघाच्या जोरदार डरकाळ्या ऐकू येत होत्या. गवे व इतर वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्री शेतात रखवाली करणारे शेतकरी सावध झाले होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हाजगोळी येथील म्हात्रू कोळसेकर व अमोल ज्ञानोबा पाटील हे शेताच्या
रखवालीनंतर दुचाकीवरून घरी परतत असताना रस्त्याच्या वळणावर अचानक पट्टेरी वाघ दिसल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली. काही काळ बाघ रस्त्यालगत ठाण मांडून बसल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरात यापूर्वीही बाघ, ब्लॅक पँथर आणि बिबट्याचा वावर अनेकदा आढळून रखवालीनंतर दुचाकीवरून घरी परतत असताना रस्त्याच्या बळणावर अचानक पट्टेरी वाघ दिसल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली. काही काळ बाघ रस्त्यालगत ठाण मांडून बसल्याचे त्यांनी सांगितले.

या परिसरात यापूर्वीही बाघ, ब्लॅक पँथर आणि बिबट्याचा वावर अनेकदा आढळूनआला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पाळीव कुत्र्यांवर हल्ले करून त्यांचा फडशा पाडल्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत.सुमारे आठ-दहा दिवसांच्या शांततेनंतर पुन्हा एकदा या बन्य प्राण्यांचे दर्शन झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावटपसरले आहे.

Advertisement

दरम्यान,नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, गस्त वाढवावी आणि वन्य प्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.