For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार्टर्ड विमानांच्या ऑपरेटर्ससाठी कठोर नियम

06:15 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
चार्टर्ड विमानांच्या ऑपरेटर्ससाठी कठोर नियम
Advertisement

विमान किती जुने हे सांगावे लागणार : देखभालीचा तपशील नमूद करणे बंधनकारक

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नागरी उ•ाणावर नजर ठेवणारी शासकीय संस्था डीजीसीएने नॉन-शेड्युल्ड ऑपरेटर (चार्टर्ड विमान, एअर अॅम्ब्युलेंस)साठी नियम कठोर केले आहेत. आता ऑपरेटर्सना स्वत:च्या वेबसाइटवर विमानाच्या देखभालीचा इतिहास सार्वजनिक करावा लागणार आहे. याचबरोबर विमान किती जुने आहे हे सांगावे लागणार आहे. तसेच कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचे डीजीसीएने स्पष्ट केले आहे. आता वैमानिकापासून कंपनी संचालकाला कारवाईच्या कक्षेत आणले जाणार आहे. सुरक्षेच्या चुकीचे खापर केवळ वैमानिकांवर फोडता येणार नाही, तर व्यवस्थापकालाही व्यक्तिगत स्वरुपात जबाबदार ठरविले जाणार असल्याचे डीजीसीएने स्पष्ट केले आहे.

Advertisement

झारखंडमध्ये एक चार्टर्ड विमान कोसळल्यावर डीजीसीएने अशा सर्व ऑपरेटर्ससोबत एक बैठक घेतली आहे. या बैठकीत ऑपरेटर्सना त्यांच्या सुरक्षा इतिहासाच्या आधारावर मानांकन देण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. परंतु हे मानांकन डीजीसीएच्या वेबसाइटवर अपलोड केले जाणार आहे. डीजीसीएने हा निर्णय मागील एक महिन्यात नॉन-शेड्युल्ड ऑपरेटर्सकडून संचालित दोन चार्टेड विमाने कोसळल्यावर घेतला आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास वैमानिकांचा परवाना कमाल 5 वर्षांपर्यंत निलंबित केला जाऊ शकतो असेही डीजीसीएने स्पष्ट पेले आहे. तर जुनी विमाने आणि मालकी परिवर्तनाच्या प्रक्रियेला सामोरे जाणाऱ्या विमानांची विशेष देखरेख केली जाणार आहे.

नियमित वेळापत्रक युक्त कमर्शियल फ्लाइटचे संचालन न करणाऱ्या परंतु आवश्यकता किंवा बुकिंगच्या आधारावर उ•ाण करणाऱ्या कंपन्यांना नॉन-शेड्युल्ड ऑपरेटर म्हटले जाते.

मुख्य उपाययोजना...

-विमानाचे वय, देखभाल, वैमानिकाच्या अनुभवाचा खुलासा अनिवार्य

-डीजीसीए वेबसाइटवर सुरक्षा मानांकन प्रकाशित होणार

-सीव्हीआर अन् ड्युटी डाटाचे रँडम ऑडिट वाढविले जाणार

-वरिष्ठ व्यवस्थापनाला थेट स्वरुपात जबाबदार धरले जाणार

-नियमांचे उल्लंघन झाल्यास परवाना 5 वर्षांपर्यंत निलंबित होणार

-जुन्या आणि मालकी बदलत असलेल्या विमानांची कठोर देखभाल तपासणी

-आवश्यकता भासल्यास एमआरओला अनिवार्य आउटसोर्सिंग

-वैमानिकांसाठी रियल-टाइम हवामान अपडेट सिस्टीम अनिवार्य

-हवामान जागरुकता प्रशिक्षणावर जोर, फेज-2 सेफ्टी ऑडिट सुरू होणार

-संबंधित घटकांसाठी कार्यशाळा आयोजित होणार

Advertisement
Tags :

.