संगीत वाजविण्यावर कडक निर्बंध
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बैठकीत विविध निर्णय
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात पर्यटन हंगाम, धार्मिक उत्सव आणि लग्न सोहळा, ख्रिसमस (नाताळ), नवीन वर्ष आता जवळ आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत संगीत वाजविण्यावर मर्यादा आल्या असून, काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. रात्री दहानंतर परवाना नसताना संगीत वाजवल्यास आणि नियमांचे उल्लंघन केल्यास एक लाख ऊपयांपर्यंत संबंधितांना दंड भरावा लागणार आहे. याबाबतचे कठोर निर्णय गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बैठकीत घेतले आहेत.
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, व्यावसायिक आस्थापने वा इतर आस्थापनांनी आवाजाच्या नियमांचे दोन वेळा उल्लंघन केल्यास आस्थापने सील करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तीन महिन्यांसाठी परवाने रद्द करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही नियम (एसओपी) ठरविले आहेत. पहिल्यांदाच ध्वनिप्रदूषणाबाबत नियम मोडल्यास आस्थापनाच्या मालकास 20 हजार ऊपये दंड भरावा लागणार आहे. दुसऱ्या वेळेस नियम मोडल्यास 40 हजार ऊपये दंड आकारण्यात येणार आहे. तर दंड न भरल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्याविऊद्ध नेमणूक केलेले अधिकारी कारवाई करणार असल्याचेही मंडळाने सांगितले.
लाऊडस्पीकरसाठी परवानगी आवश्यक
लाऊडस्पीकर लावण्यासाठी लेखी परवानगी घ्यावी लागणार असून, आवाजाची मर्यादाही ठरविण्यात आली आहे. त्यानुसार, व्यावसायिकसाठी 66 डीबी (दिवसाला), 55 डीबी (रात्री). निवासी क्षेत्रासाठी 55 डीबी (दिवसाला), 45 डीबी (रात्री). शांततेचे ठिकाणी 50 डीबी (दिवसाला), 40 डीबी (रात्री).
पोलिसांची घ्यावी लागणार अतिरिक्त परवानगी
ट्रान्समीटर, हेडफोन वा इतर तंत्रज्ञान वापरून संगीत वाजविण्यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त परवानगी घ्यावी लागणार आहे. आवाजाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी लक्ष ठेवणार आहेत. परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वाजविण्यास किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठकाही घेण्यास मिळणार नाही, असा निर्णय मंडळाने घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
रात्री दहानंतर संगीत वाजवल्यास एक लाख ऊपयांपर्यंत भरावा लागणार दंड
...तर पोलिसांकडून घ्यावी लागणार अतिरिक्त परवानगी