For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : सातारा तालुक्यात संवेदनशील गावांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त

04:40 PM Jan 30, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   सातारा तालुक्यात संवेदनशील गावांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त
Advertisement

                   निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढे व वडूथमध्ये पोलिसांचा रूट मार्च

Advertisement

सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुक्यातील संवेदनशील असलेल्या वाढे आणि वडूथ या गावात तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने रुट मार्च काढण्यात आला. बहुध येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात जातीय दंगा काबू पथकाचा सराव करण्यात आला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी तालुका पोलिसांना निवडणूक आचारसंहिता अनुषंगाने बंदोबस्त मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाण्यात सूचना दिल्या. तसेच बडूथ येथील जिल्हा परिषद शाळा येथे जातीय दंगा काबू योजना सराव घेण्यात आला.

Advertisement

त्यानंतर बडूथ गावामध्ये रूट मार्च काढण्यात आला. तसेच बाढे येथेही रूट मार्च काढण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव, पोलीस निरीक्षक मोरडे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे काटकर, निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय शिंदे, बरिष्ठ लिपीक तुषार पोळ, आरोग्य विभाग व अग्निशामक दलाचे कर्मचारी असे ११ अधिकारी, ४७पोलीस अंमलदार, १ आरसीपी पथक, ७ शासकीय वाहने सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :

.