महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ड्रग्ज नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना

06:22 AM Nov 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर : चॉकलेट, गोळ्यांच्या स्वरुपात मेडिकलमध्ये ड्रग्ज उपलब्ध होत असल्याच्या आरोपावर

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्यात काही ठिकाणी चॉकलेट आणि गोळ्dयांच्या स्वरूपात ड्रग्जची विक्री होत असून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत, अशी माहिती गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सोमवारी दिली. ड्रग्ज नियंत्रणात सरकार अपयशी ठरले आहे. काही मेडिकलमध्ये गोळ्यांच्या स्वरुपात ड्रग्ज उपलब्ध होत आहे. त्यामुळे गरीब मुले भरकटत आहेत, असा आरोप एका महिलेने केला आहे. त्यावर गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.

म्हैसूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. राज्य सरकारने ड्रग्जविरोधी मोहीम उघडली आहे. वर्षभरात कोट्यावधी ऊपयांचे ड्रग्च जप्त करण्यात आले असून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परदेशातून आलेल्या आणि ड्रग्जविक्रीमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही जणांना हद्दपार केले आहे. जवळपास 70 ते 80 विदेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. अन्यथा त्यांच्याविरुद्ध केवळ गुन्हे नोंदवले तर ते येथे राहून पुन्हा अवैध व्यवहार सुरू ठेवतील. या संदर्भात ड्रग्ज विक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकांच्या देशाच्या दूतावासांना आणि अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल. तसेच त्यांना हद्दपार करण्यात येईल, असे ते म्हणाले.

ड्रग्ज प्रकरणी आरोपींवर कारवाई करण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कारण ड्रग्जची चॉकलेटच्या स्वरूपात विक्री केली जात असल्याचे आढळले आहे. काही मेडिकल स्टोअरमध्ये ती गोळ्dयांच्या स्वरूपात त्याची विक्री होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. अशा बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्या मेडिकल स्टोअर्सचा परवाना रद्द करण्याची  शिफारस करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

केवळ कर्नाटकातच नव्हे तर मुंबई आणि दिल्लीसह संपूर्ण देशात ही समस्या  आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मी महाराष्ट्राचा पक्षप्रभारी होतो तेव्हा तिथेही  हा प्रश्न उद्भवला होता, असे ते म्हणाले.

मी माहिती मिळविल्याप्रमाणे बंदरांमधून औषधे मोठ्या प्रमाणात येतात. त्यावर आम्हाला सातत्याने करडी नजर ठेवावी लागेल. ड्रग्ज शरीरात लपवून आणत असल्याचे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. विमानतळ आणि आंतरराज्य वाहतूक व्यवस्थेद्वारेही ड्रग्ज बेकायदा वाहतूक केली जाते. विशाखापट्टणममध्ये दीड टन गांजा जप्त करण्यात आला आहे. आम्ही सातत्याने ड्रग्ज वाहतूक व व्यवहारावर लक्ष ठेवून आहोत, अशी माहितीही डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली.

राज्यातील गांजाच्या अवैध वाहतूक व विक्रीविषयी बोलताना परमेश्वर म्हणाले,  गांजाचे दोन प्रकार आहेत. त्यातील एक प्रकारचा गांजा राज्यात अल्प प्रमाणात पिकविला जातो. छापेमारी करून आम्ही त्यावर नियंत्रण आणणार आहे. दुसरे म्हणजे राज्यात हायड्रो-गांजाचा धोका वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत, असेही ते म्हणाले.

बेंगळूरमधील काही मेडिकलमध्ये ड्रग्ज असणारे गोळ्या व इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. यामुळे गरीब मुले भरकटत आहेत. पोलीस कारवाई करताना दिसून येत नाहीत. सरकार याकडे डोळेझाक करत आहेत, असा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ड्रग्जवर नियंत्रण आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोपही या महिलेने केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article