महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिलांवरील अत्याचाराविरोधात कडक कायदे करणार

06:14 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगाव येथे घोषणा : सरकारे येतील जातील पण नारीची सुरक्षा करणे हे आपले कर्तव्य

Advertisement

प्रतिनिधी/ जळगाव

Advertisement

महिलांवरील अत्याचार हा अक्षम्य अपराध आहे. तो करणाऱ्यांना मदत करू नका. सरकारे येतील आणि जातील पण नारीची सुरक्षा करणे हे आपले कर्तव्य आहे. पीडित महिला, मुली या घरातूनच ई-एफआयआर दाखल करू शकतात. केंद्र सरकार अत्याचार रोखण्यासाठी दक्ष असल्याचे सांगत अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात सरकार कडक कायदे करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जळगाव येथील लखपती दिदी संमेलनात बोलताना केली आहे.

रविवारी जळगावला बचत गटाच्या 48 लाख  सदस्यांना 2500 कोटींचे वितरण आणि 26 लाख बचतगट सदस्यांना 5000 कोटींचे बँक कर्ज ई-वितरण लखपती दिदी संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते पार पडले. या प्रसंगी देशातील विविध राज्यातील अकरा दीदींना लखपती झाल्याबद्दल पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

श्रीकृष्ण जयंतीच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणास सुरवात केली. दोन लाखावर उपस्थित महिलांना त्यांनी मातांचा महासागर म्हटले. पंतप्रधानांनी नुकताच केलेला परदेश दौरा आणि तेथे भेटलेले महाराष्ट्रीयन यांचा अनुभव विशद  करताना पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे कौतुक केले. तेथे तयार केलेल्या कोल्हापूर मेमोरियलचा गौरवपूर्ण उल्लेख करत महाराष्ट्राचा सेवाभाव उच्च आहे, येथील मातृशक्तीने देशाला प्रेरीत केले आहे, असे सांगत राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांचे कार्य आजच्या पिढीला  प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आपणास तीन कोटी लखपती दिदी करायच्या  आहेत. महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना आणल्या, त्याचा महिलांना लाभ झाला. आता लखपती दिदी योजनेमुळे येणारी पिढी ही मजबूत होईल. एक महिला लखपती झाली, की एका परिवाराचे भाग्य बदलते. भारत तिसरी मोठी ताकद होत असून त्यात महिलांचा मोठा वाटा आहे. 2014 पर्यंत 35 हजार कोटींपेक्षा कमी बँक  कर्ज दिले गेले पण गेल्या दहा वर्षात 9 लाख कोटी मदत केली गेली.  ही 30 पट असून यामुळे देशाची मजबुती वाढल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

 नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संमेलनाने महिलांच्या उपस्थितीचे सर्व विक्रम मोडले असल्याचे सांगत अभूतपूर्व उपस्थितीबद्दल बहिणींचे आभार मानले व असेच प्रेम असू द्या, अशी विनंती केली. नेपाळ दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हयातील पाडळसे, वाघूर योजना यांना दिलेल्या निधीचा उल्लेख केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने आलेल्या महिलांना सलाम केला.

महायुतीचे सरकार म्हणजे उद्योग आणि नोकरीची गॅरंटी

महाराष्ट्र विकसित भारताचा चमकता तारा आहे. गुंतवणुकीसाठी आणि नोकरीसाठी चांगला आहे. महायुतीचे सरकार म्हणजे उद्योग आणि नोकरीची गॅरंटी आहे. अनेक वर्ष स्थिर सरकारसाठी महायुतीच्या सरकारची गरज आहे. इथल्या महिला साथ देतील, असेही मोदी यांनी यावेळी म्हटले.

Advertisement
Next Article