‘पीएमओ’च्या सिमकार्ड खरेदी, विक्रीसाठी कडक सूचना
बनावट सिमकार्डद्वारे फसवणूक टाळण्यासाठी नवे नियम
नवी दिल्ली :
बनावट सिमकार्ड खरेदी आणि विक्रीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एक नवीन आदेश जारी केला आहे. बनावट सिम कार्डमुळे होणारी फसवणूक रोखण्यासाठी हा आदेश सादर करण्यात आला असल्याची माहिती आहे. यामध्ये पीएमओने दूरसंचार विभागाला (डीओटी) हा आदेश दिला आहे ज्या अंतर्गत नवीन सिमकार्ड जारी करण्यासाठी बायोमेट्रिक आधार पडताळणीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सिमकार्डसाठी आधार पडताळणी आवश्यक आहे. बनावट कागदपत्रांसह सिमकार्ड खरेदी करून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. हे लक्षात घेता, पीएमओने दूरसंचार विभागाला कडक आदेश जारी केले आहेत
की बायोमेट्रिक आधार पडताळणीशिवाय कोणतेही सिमकार्ड जारी करू नये. यासोबतच, फसवे सिमकार्ड जारी करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करून शिक्षा केली जाणार आहे.
नवीन सिमकार्ड खरेदीसाठी...
? आधारकार्ड आवश्यकच
? मतदार ओळखपत्र
? पासपोर्ट
? किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र आवश्यक