For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गॅरंटी’ची काटेकोर अंमलबजावणी करा

10:54 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘गॅरंटी’ची काटेकोर अंमलबजावणी करा
Advertisement

उपाध्यक्ष एस. आर. पाटील : गॅरंटी योजनांची प्रगती आढावा बैठक

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारच्या गृहलक्ष्मी, गृहज्योती, शक्ती, अन्नभाग्य व विद्यानिधी योजनांची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, शिवाय एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना राज्य गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे उपाध्यक्ष एस. आर. पाटील यांनी केली. सोमवारी जिल्हा पंचायतच्या सभागृहात गॅरंटी योजनांची प्रगती आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विनय नावलगट्टी, महिला व बाल कल्याण खात्याचे सहसंचालक नागराज आर., जि. पं. सीईओ राहुल शिंदे, उपकार्यदर्शी बसवराज हेग्गनायक उपस्थित होते.

महिलांसाठी अमलात आणलेल्या शक्ती योजनेतंर्गत दररोज 4.89 लाख महिला मोफत प्रवास करीत आहेत. त्याबरोबर गृहलक्ष्मी योजनेतर्गंत नेंद झालेल्या 10.77 लाख महिलांना दरमहा निधी दिला जात आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. त्याबरोबर गृहज्योती योजनेंतर्गत मोठ्याप्रमाणात कुटुंबीयांना 200 युनिटचा लाभ मिळाला आहे. दरमहा 38 कोटी रुपयांचा खर्च सरकार उचलत आहे. शक्ती योजनेंतर्गत दररोज 4.89 लाख महिलांचा मोफत प्रवास सुरू आहे. तर जिल्ह्यातील पदवीधारकांना विद्यानिधी अंतर्गत डिबीटीद्वारे निधी अदा केला जात आहे. दररोज महिलांच्या प्रवासासाठी शासन 1.15 कोटी रुपये खर्च करीत असल्याची माहिती परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.