For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विमानतळावर आता कडेकोट तपासणी

10:53 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
विमानतळावर आता कडेकोट तपासणी
Advertisement

नवीन एक्स-बीआयएस मशीन कार्यरत

Advertisement

बेळगाव : बेळगाव विमानतळाच्या सुरक्षा यंत्रणेत नवीन एक्स-बीआयएस मशीनची भर पडली आहे. प्रवाशांच्या सामानाची यापुढे ‘एक्स-रे बॅगेज इन्फर्मेशन सिस्टीम’ याद्वारे तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही धोकादायक वस्तू तात्काळ सापडली जाणार असून सुरक्षा यंत्रणांवरही ताण काहीसा कमी होणार आहे. गुरुवारी बेळगाव विमानतळावर एक्स-बीआयएस मशीन बसविण्यात आली. बेळगाव विमानतळाचे उपसंचालक प्रताप देसाई यांच्या हस्ते या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने सामानाची तपासणी करण्यासाठीचा ताण वाढत आहे. त्यामुळे अधिक मनुष्यबळ केवळ सुरक्षा यंत्रणेमध्ये खर्ची घालावे लागत होते. प्रत्येक महिन्याला 30 हजारांहून अधिक प्रवासी बेळगाव विमानतळावरून प्रवास करीत असल्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरत होते. विमानामधून कोणतेही टोकेरी साहित्य, ज्वलनशील पदार्थ व इतर घातक वस्तू ने-आण करण्यावर बंदी आहे. बऱ्याच वेळा प्रवाशांची बॅग पूर्णपणे उघडून तपासणी करणे वेळेनुसार शक्य नसते. त्यावेळी एक्स-रे मशीनद्वारे सामानाची तपासणी करणे सोयीचे ठरणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.