Kolhapur : बोगस प्रमाणपत्र प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार
सीपीआरमध्ये दोषींवर कठोर कारवाईची तयारी
कोल्हापूर : सीपीआरमध्ये बोगस दिव्यांग व आरोग्य प्रमाणपत्र प्रकरणातील दोषी डॉक्टर व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी सांगितले.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणासाठी नेमलेल्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार खोटे दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत केल्याचे आढळून आले आहे. संबंधित डॉक्टर व तत्कालिन शल्यचिकित्सकांकडुन प्रमाणपत्र वितरीत करताना कागदपत्रांमध्ये विसंगती व त्रुटी आढळल्या आहेत.
याचा सविस्तर अहवाल राज्य शासन, आरोग्य विभाग, आरोग्य उपसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. याची सखोल चौकशी करण्यात येणार असुन दोषींवर कठोर कारवाईसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. यापुढे असे गैरप्रकार रोखण्यासाठी कागदपत्रात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. भिसे यांनी सांगितले.