बेकायदेशीर गर्भलिंग निदानातील आरोपी विरोधात मोकासारखी कडक कारवाई करण्याचा विचार आरोग्य मंत्री आबिटकर
कोल्हापुरात मुलींचा जन्मदर कमी ही अशोभनीय बाब, गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कडक करवाई करणार, आरोग्यमंत्र्यांचा इशारा
कोल्हापूर
जीबीएस मुळे कोल्हापुरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला पुण्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले. यावेळी आपण घाबरलो मात्र आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना दिल्यानुसार सर्वजण त्याचा पालन करत आहेत. यामुळे रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात आपल्याला यश आलेला आहे. गेल्या महिन्याभरात २०० च्या आसपास रुग्ण सापडले आहेत आणि सात ते आठ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतिकारशक्ती कमी असणे आणि जुन्या आजारांमुळे काही जणांचा मृत्यूची भिती असते. भविष्यात अशा घटना होणार नाहीत यासाठी आरोग्य विभाग सतर्क आहे. पेशंटची संख्या किती आहे तितके डिस्चार्ज होण्याची देखील आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
शक्तिपीठ महामार्गाविषयी बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले, शक्तिपीठ महामार्गात मतमतांतर असणे साहजिक आहे राज्य सरकारकडून महामार्ग करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. मात्र हा महामार्ग ज्या मतदारसंघातून जाणार आहे तेथील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत. यासंदर्भात वस्तुस्थिती आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार.
कोल्हापूरचे छापेमारी सुरू आहे यातून चांगले रिझल्ट येत आहेत आणखीन छापे होणे गरजेचे आहे. कोल्हापुरात मुलींचा दर कमी होत आहे ही बाब शोभनीय नाही. तक्रारदार महिलेला देखील एक लाख रुपये देण्याचा नवीन जीआर लवकरच काढणार आहे. ही एक सामाजिक जबाबदारी असून असे कोणी कृत्य करत असेल तर कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात पुन्हा नवीन सरकार स्थापन झाला आहे. यामुळे शिवसैनिकात उत्साहाचा वातावरण आहेत. कोकणातील देखील काही दिग्गज नेते सहभागी होत आहेत. अशा पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा आम्ही स्वागत करू. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज्यभर काम करणार आहोत. यामुळे जिल्ह्यातून देखील कोण येतील त्यांना घेऊन जाणार आहोत.