For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा : रामदास आठवले

06:31 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा    रामदास आठवले
Advertisement

मुंबई  

Advertisement

पवईतील आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येस जबाबदार असणा‚या प्रा.सुर्यनारायण डुल्ला यांना सेवेतुन निलंबित करावे. तसेच या या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  केली.

पवई येथील आयआयटी मुंबई  येथे आठवले यांनी आज भेट दिली. पवई आयआयटी मुंबईच्या  पदाधिका‚यासोबत साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणाची माहिती घेण्यासाठी त्यांनी बैठकही घेतली. या बैठकीत पवई आयआयटीचे डायरेक्टर शिरीष केदारे,  उपसंचालक रवींद्र गुडीय प्रा.मिलिंद अत्रेय रजिस्ट्रार  गणेश बोरखडे तसेच  क्राईम ब्रँचचे एसीपी धर्मपाल बनसोडे तसेच मागासवर्गीय कर्मचारी असोसिएशन चे रमेश गायकवाडय बाळ पवई गऊडय विलास बेलेकरय रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारेय काकासाहेब खांबाळकरय चंद्रशेखर कांबळेय सचिन बनसोडेय अमित तांबेयप्रकाश जाधव अजित रणदिवे विनोद जाधव आदि अनेक अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

यानंतर आठवले यांनी आयआयटी मुंबईतील पवईत असणा‚या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलला भेट दिली. हॉस्टेल क्र. 4 मध्ये ज्या खोलीत साहिल वाकोडे यांनी आत्महत्या केली त्या घटनास्थळाला आठवले यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांना आयआयटी पवईत जे हॉस्टेल बांधुन दिलेले आहे त्या खोल्या एखाद्या कारागफहाप्रमाणे आहेत त्यावरही ना. रामदास आठवले यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.