कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रीय महामार्गावर हवी पथदिव्यांची सोय

05:13 PM Apr 01, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

नागठाणे :

Advertisement

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सर्वतोपरी पथदिव्यांची सोय करणे सध्याचे दिवसात गरजेचे वाटत आहे. साताराकडून कराड बाजूकडे तसेच कराडकडून सातारा बाजूकडे जाणाऱ्या येणाऱ्या मार्गिकवर बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग प्राधिकरण महामंडळाने पथदिव्यांचे सोबतच सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची सोय करणे सुद्धा आत्ताचे दिवसातील काळाची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मागील कित्येक महिन्यांपासून वळसे ते कागलपर्यंतचे सहापदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये गेले कित्येक दिवस पाहिले असता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तसेच कराड - बाजूने येणाऱ्या जाणाऱ्या मार्गिकवरून कित्येक वाहनांचा कायम दिवस रात्र खूप वेगाने प्रवास चालू असून याच सातारा ते कराड भागातील राष्ट्रीय महामार्गावरील बरीच ठिकाणे शासनाकडून अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. वळसेपासून अगदी कराडपर्यंत पाहिले तरी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण झालेला दिसत असून सध्या सहापदारीकरण कामकाज वेगाने चालू आहे. या मार्गावरून तसेच अगदी सेवा रस्त्यावरून सुद्धा वाहने खूप वेगाने प्रवास करताना दिसतात. आजपर्यंत या ठिकाणी खूप लहान मोठे तसेच विचित्र अपघात पाहायला मिळाले आहेत.

कितीतरी लोक यामध्ये अधू झाले आहेत तर काहींनी यामध्ये प्रसंगी आपले प्राणही गमावले असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही ठिकाणी अपघात घडताना गाडीचा टायर फुटल्याने गाडी दुभाजकास धडकून पलटी होते. अशा वेळी काही स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून येतात तर काहीजण गाडीतून खाली पडलेला माल घेऊन पोबारासुद्धा करतात. अशा सर्रास घटना या महामार्गावर आजपर्यंत पाहायला मिळाल्या आहेत. याा विचार करता राष्ट्रीय महामार्गावर सर्व ठिकाणी पथदिवे असणे गरजेचे आहेच तरीही यासोबतच तूर्तास तरी अपघात प्रवण क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावणे खूप महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे.

महामार्गावर काही गाड्यांना हेडलाइट्सचाही प्रॉब्लेम असतो त्यामुळे सदर राष्ट्रीय महामार्गावर पथदिव्यांची चांगली सोय झाली तर सुरक्षित अंतर ठेवून प्रवासासाठी त्याचा चांगला उपयोग होवून प्रसंगी होणारे अपघात टाळता येतील.

तसेच त्याचबरोबर पथदिव्यांसोबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय करण्यात आली तर अपघातांचे खरे कारण समोर येईल आणि पोलिसांना सुद्धा यातून तपासकामी खूप मदत होईल आणि झालेल्या अपघाताचे वास्तव समोर येईल. म्हणून महामार्ग राज्य प्राधिकरण महामंडळाने या बाबींचा सखोल विचार करून राष्ट्रीय महामार्गावर पथदिव्यांसोबतच अपघात प्रवण क्षेत्रात तरी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची तसदी घ्यावी. 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article