आंबेडकरनगर, मरगाई मंदिर परिसरातील पथदीप, हायमास्टची मनपाकडून दुरुस्ती
बेळगाव : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 51 मध्ये येणाऱ्या आंबेडकरनगर, मरगाई मंदिर अनगोळ येथील पथदीप आणि हायमास्ट गेल्या 15 दिवसांपासून बंद पडले होते. त्यामुळे नागरिकांना अंधारातून वाट शोधावी लागत होती. ही बाब लक्षात येताच नगरसेवक श्रीशैल कांबळे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केल्याने मंगळवारी परिसरातील बंद पडलेले पथदीप व हायमास्ट सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या शहर व परिसरातील काही भागात पथदीप व हायमास्ट बंद स्थितीत आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी अंधारमय परिस्थिती निर्माण होते. तरीही याकडे महापालिकेने दुर्लक्ष चालविले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रभाक क्रमांक 51 मध्ये येणाऱ्या आंबेडकरनगर, मरगाई मंदिर अनगोळ येथील पथदीप व हायमास्ट गेल्या 15 दिवसांपासून बंद होते. ही बाब लक्षात येताच नगरसेवक श्रीशैल कांबळे यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले व त्या ठिकाणी थांबून दुरुस्ती करून घेतले. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.