For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळेकुंद्री भागात पथसंचलन

10:28 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळेकुंद्री भागात पथसंचलन
Advertisement

वार्ताहर /बाळेकुंद्री

Advertisement

लोकसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीएसएफ, सीआरपीएफ व मारिहाळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्यावतीने मारिहाळचे सीपीआय कृष्णशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मारिहाळ पोलीस ठाणे हद्दीतील बाळेकुंद्री, सांबरा, मारिहाळ व आदी गावातील प्रमुख मार्गावरून मंगळवारी पथसंचलन करण्यात आले. मतदार संघात निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासह बंदोबस्तासाठी  बीएसएफ, सीआरपीएफच्या शंभरहून अधिक जवानांची तुकडी गेल्या दोन दिवसांपूर्वी दाखल झाली आहे. अतिसंवेदनशील भागात तसेच हद्दीतील प्रमुख गावच्या मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. निवडणूक काळात शांतता बिघडू नये यासाठी ही तुकडी नियंत्रण ठेवणार असल्याचे सांगून सध्या असणारे पोलीस कर्मचारी विविध नाक्यावर तैनात करण्यात आल्याचे सीपीआय कृष्णशेट्टी यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.