‘स्ट्रीट फायटर’चा ट्रेलर प्रदर्शित
विद्युत जामवालचा पहिला हॉलिवूडपट ‘स्ट्रीट फायटर’चा ट्रेलर समोर आला आहे. चित्रपटातील अभिनेत्याचा लुक पाहून सर्वजण चकित झाले आहेत. या चित्रपटात विद्युत आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या अवतारात दिसून येत आहे. मार्शल आर्ट्समध्ये पारंगत विद्युत ‘स्ट्रीट फायटर’मध्ये रहस्यमय योगीच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट याच नावाने अत्यंत लोकप्रिय व्हिडिओ गेम फ्रँचाइजीवर आधारित आहे. चित्रपटातील अन्य मुख्य भूमिकांचे फर्स्ट लुक पोस्टरही सादर करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये विद्युत हा क्लीन शेव्ह हेडमध्ये दिसून येत असून त्याच्या चेहरा आणि माथ्यावर लाल रंगाच्या रेषा दिसून येत आहेत. चित्रपटात नोआ सेंटीनो आणि कॅलिना लियांग आहे. तर इतर कलाकारांमध्ये कोडी रोड्स, वेगाच्या रुपात ऑरविले पके, ब्लँकाच्या रुपात जेसन मोमोआ, जांगिफच्या भूमिकेत ओलिवर रिक्टर्स, ई होंडाच्या रुपात हिरुकी गोटो, एम बायसनच्या भूमिकेत डेव्हिड डस्टमलचियन, अकुमाच्या भूमिकेत रोमन रेंस, डॅन हिबिकीच्या भूमिकेत एंड्य्रू शुल्ज, डॉन सॉवेजच्या रुपात एरिक आंद्रे, कॅमीच्या भूमिकेत मेल जर्नसन दिसून येईल.