अनगोळ परिसरात रात्री भटक्या कुत्र्यांचा पार्क करून ठेवलेल्या गाड्यांवरही हल्ला
बेळगाव : भटक्या कुत्र्यांनी, बेळगाव शहरातील अनगोळ मुख्य रस्त्यावरील रॉयल कोल्ड्रिंक्स जवळ, रात्रीच्या वेळी घराबाहेर उभी करण्यात आलेल्या, आणि झाकून ठेवण्यात आलेल्या कारवर कुंत्र्यांच्या कळपाने हल्ला करून कारचे नुकसान केले आहे. दरम्यान या हल्ल्यात गाडीचे बोनेट आणि बाजूच्या भागांवर अनेक ओरखडे उमटले असून, काही ठिकाणी तर चावल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. दुरुस्तीचा खर्च एक लाखापेक्षा अधिक आहे. या समस्येवर महानगर पालिका खरंच काही उपाययोजना करत आहे का? की दरवेळी फक्त शांत बसून बघ्याची भूमिका घेत आहे? असा सवाल अनेक त्रस्त नागरिकांतून होत आहे. गेल्या आठवड्यात अशा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला होता. तसेच ब्रह्ममंदिर, पापामाळा, शिवाजी कॉलनी, टिळकवाडी जवळ भटक्या कुत्र्यांमुळे वाहनावरून पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे. प्राणीप्रेमी संघटणांनी अशा कुत्र्यांच्या हल्यांच्या घटनेमागील गांभीर्य समजून घेणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने अशा भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि कृती करावी असे मत असंख्य नागरिक करत आहेत.